सूज म्हणजे एक शरीराचा भाग तात्पुरता असामान्य आकारात वाढणे आहे. हे उती मध्ये द्रवपदार्थ जमा झाल्याने होते. सूज ही सामान्यीकृतपणे संपूर्ण शरीरावर येऊ शकते, किंवा एक विशिष्ट भाग किंवा अवयव प्रभावित होऊ शकतो. सूज ही वेदना, उष्णता, लालसरपणा या वैशिष्ट्येंपैकी एक मानली जाते. शरीराला इजा, संसर्ग, किंवा रोग प्रतिसादात सूज येऊ शकते. तसेच शरीरात योग्यप्रकारे द्रवपदार्थ प्रसारित नाही झाले तर सूज, येऊ शकते. खाण्यात क्षार किंवा मीठ याचे प्रमाण जास्त झाल्यास सोडियमचा अणू शरीरात साचून राहतो तयामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्वचेखाली पाणी साचले तर त्वचेवर सूज येऊ लागते.[१]

प्रकार संपादन

बाह्य म्हणजे शरीरावरील सूज संपादन

 • पायावर सूज - एकाच पायावर सूज आली असेल तर बहुधा 'स्थानिक' स्वरूपाचे म्हणजे त्या पायाशी संबंधित आजार असतात. जसे की पाय मुरगाळणे वगैरे. मात्र हत्तीरोग असण्याची शक्यता तपासून पाहावी. सूज दोन्ही पायांवर असेल तर, गर्भाररोग, हृदय, यकृत, मूत्रपिंड या संदर्भातील आजार असण्याची शक्यता असते.[२] तसेच कुपोषण-रक्तपांढरी, अन्नविषबाधा किंवा असते. म्हणून दोन्ही पायांवर सूज असेल तर तज्ज्ञाकडे तपासणी अतिशय आवश्यक असते.

शरीराअंतर्गत सूज संपादन

 • मेंदूस सूज - गोवरामध्ये मेंदूस सूज आली म्हणजे गंभीर परिस्थिति ओढवते.
 • रक्तवाहिन्यांना सूज - उदाहरण मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या नीलांना सूज येऊन रक्त साठून राहणे.
 • जलोदर - हा द्रवयुक्त सूजेचा प्रकार असतो.[३]
 • सांध्यांची सूज - संधीवात सांध्यांचा असा आजार ज्यात सांध्यांना त्यांना सूज येते.[४]
 • गर्भाशयाला सूज = मुलींमध्ये आणि बायकांमध्ये गर्भाशयाच्या अस्तराला सूज येणे (एंडोमेट्रिओसिस), बीजकोषांची (ओव्हरीज) सूज, अशा तक्रारी दिसून येतात.[५] या तक्रारींसाठी त्वरेने तज्ज्ञाचा सल्ला आवशयक असतो.

उपचार संपादन

सौम्य सूज आपोआप जाणे शक्य असते. याशिवाय अनेक आराम किंवा गार गरम शेक देऊन सूज घालवता येते. प्रथमोपचार पद्धतीत प्रभावित क्षेत्राला संरक्षण देऊन सूजेवर उपचार केले जातात.

संदर्भ संपादन

 1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2014-08-02. 2014-08-19 रोजी पाहिले.
 2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-25. 2014-08-19 रोजी पाहिले.
 3. ^ http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11239
 4. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-dr-4687850-PHO.html
 5. ^ http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=314