मुलुगु जिल्हा

तेलंगणा राज्यातील जिल्हा

मुलुगु जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. मुलुगु येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु जिल्ह्यासह नारायणपेट जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तेलंगणा राज्यातील जिल्हा्यांची संख्या एकूण ३३ झाली.[१][२]

रामप्पा मंदिर
मुलुगु
ములుగు జిల్లా(तेलुगु) Mulugu District
तेलंगणा राज्यातील जिल्हा
मुलुगु जिल्हा चे स्थान
मुलुगु जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय मुलुगु
निर्मिती १७ फेब्रुवारी २०१९
मंडळ
क्षेत्रफळ
 - एकूण ३,८८१ चौरस किमी (१,४९८ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण २,९४,६७१ (२०११)
-लोकसंख्या घनता ७६ प्रति चौरस किमी (२०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ५%
-साक्षरता दर ६३.५७%
-लिंग गुणोत्तर १०००/ ९६८ /
वाहन नोंदणी TS25
संकेतस्थळ


प्रमुख शहर संपादन

  • मुलुगु

भूगोल संपादन

मुलुगु जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,८८१[३] चौरस किलोमीटर (१,४९८ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सध्या वरंगल, महबूबाबाद, जयशंकर भूपालपल्ली आणि भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यांना आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहेत.

लोकसंख्या संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या मुलुगु जिल्ह्याची लोकसंख्या २,९४,६७१ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९६८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६३.५७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ५% लोक शहरी भागात राहतात.

मंडळ (तहसील) संपादन

मुलुगु जिल्ह्या मध्ये ९ मंडळे आहेत:[४]

अनुक्रम मंडळ
मुलुगु
व्यंकटापूर
गोविंदरावपेठ
एस एस ताडुवायी
एतुरनागारम
मंगापेठ
कन्नईगूडेम
व्यंकटापुरम
वाजीदु

हे देखील पहा संपादन

बाह्य दुवे संपादन


संदर्भ संपादन

  1. ^ "Mulugu District, Government of Telangana | Welcome To Mulugu District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ Rao, Gollapudi Srinivasa (2019-02-05). "Mulugu set to become newest district in TS" (इंग्रजी भाषेत). Warangal Urban Dt. ISSN 0971-751X.
  3. ^ https://mulugu.telangana.gov.in/demography/
  4. ^ https://mulugu.telangana.gov.in/revenue-mandals/