मुलुगु

तेलंगणातील शहर, भारत

मुलुगु हे तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली.[] पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु हा वारंगल जिल्ह्याचा एक भाग होता. मुलुगु हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे.

  ?मुलुगु
मुलुगु
तेलुगू : ములుగు
तेलंगणा • भारत
—  शहर  —
Map

१८° ११′ २७.६″ N, ७९° ५६′ ३४.८″ E

मुलुगु is located in तेलंगणा
मुलुगु
मुलुगु
मुलुगुचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°11′27.6″N 79°56′34.8″E / 18.191000°N 79.943000°E / 18.191000; 79.943000

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २०७ मी
हवामान
वर्षाव

• १,१३९.४ मिमी (४४.८६ इंच)
प्रांत तेलंगणा
जिल्हा मुलुगु जिल्हा
लोकसंख्या १२,१३५
भाषा तेलुगू
संसदीय मतदारसंघ महबूबाबाद
विधानसभा मतदारसंघ मुलुगु
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 506343
• +०८७१५
• TS-25[]
रामप्पा मंदिर

लोकसंख्या

संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार, मुलुगुची लोकसंख्या २,९४६ कुटुंबांसह १२,१३५ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ६,२४२ पुरुष आणि ५,८९३ स्त्रिया आहेत. ८,३२४ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ६८.६% होता.[]

भुगोल

संपादन

मुलुगुची सरासरी उंची २०७ मीटर आहे.[] मुलुगुमध्ये अर्ध-उष्णकटिबंधीय हवामान आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७८८ मिलिमीटर (३१.० इंच) आहे.[]

पर्यटन

संपादन

जगप्रसिद्ध रामप्पा मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल) अंतरावर आहे.

प्रशासन

संपादन

मुलुगु राज्य विधानसभा मतदारसंघासाठी एक जागा आहे. ग्राम पंचायती तर्फे गावाचा कारोभार पाहिला जातो.

वाहतूक

संपादन

मुलुगु येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. मुलुगु ते छत्तीसगढला जाणारा राष्ट्रीय महामार्ग १६३ आहे.

हे देखाल पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ "Mulugu District, Government of Telangana | Welcome To Mulugu District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Mulug Town , Mulug Mandal , Warangal District". www.onefivenine.com. 2022-02-06 रोजी पाहिले.
  4. ^ "Mulugu topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-06 रोजी पाहिले.
  5. ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-06 रोजी पाहिले.