मुंबई सेंट्रल−नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस
२२२०९/२२२१० मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद व आरामदायी प्रवासी रेल्वेसेवा आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईसोबत जोडणारी ही दुरंतो एक्सप्रेस पूर्णपणे वातानुकूलित असून ती पश्चिम रेल्वेद्वारे आठवड्यातून दोनदा चालवली जाते. मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस मोजक्याच स्थानकांवर थांबते व दोन शहरांमधील अंतर १६ तास ५० मिनिटांत पूर्ण करते.