मिखाएल श्टिश (जर्मन: Michael Stich; जन्म: १८ ऑक्टोबर १९६८) हा एक निवृत्त जर्मन टेनिसपटू आहे. श्टिशने १९९१ सालच्या विंबल्डन स्पर्धेत एकेरीचे तर १९९२ सालच्या विंबल्डन स्पर्धेत जॉन मॅकएन्रोसोबत दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. तसेच त्याने १९९२ बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत बोरिस बेकरसमवेत जर्मनीसाठी पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते.

मिखाएल श्टिश
Michael Stich.jpg
देश जर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्य एल्म्सहोर्न, श्लेस्विग-होल्श्टाइन, जर्मनी
जन्म १८ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-18) (वय: ५१)
पिनेबेर्ग, श्लेस्विग-होल्श्टाइन, पश्चिम जर्मनी
सुरुवात १९८८
निवृत्ती १९९७
शैली उजव्या हाताने
प्रदर्शन ३८५ - १७६
अजिंक्यपदे १८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (२३ नोव्हेंबर १९९२)
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (१९९३)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९९६)
विंबल्डन विजयी (१९९१)
यू.एस. ओपन उपविजयी (१९९४)
प्रदर्शन १६५ - १११
अजिंक्यपदे १०
शेवटचा बदल: जुलै २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
जर्मनीजर्मनी या देशासाठी खेळतांंना
टेनिस
सुवर्ण १९९२ बार्सिलोना पुरुष दुहेरी

बाह्य दुवेसंपादन करा