मा.रा. लामखडे

एक मराठी लेखक
(मा. रा. लामखडे या पानावरून पुनर्निर्देशित)

मा. रा. लामखडे उर्फ मारुती रामचंद्र लामखडे (१ जून, इ.स. १९४९:बोटा, संगमनेर, महाराष्ट्र - ) हे मराठी लेखक असून ते लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. ते संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यांनी ललित आणि संशोधनपर स्वरूपाची तेरा पुस्तके लिहिली. तमाशा आणि लावणी या त्यांच्या ग्रंथास मे २०१५ मध्ये कवी अनंतफंदी पुरस्कार मिळाला. आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीते - एक अभ्यास या विषयावर डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एम.फिल. ही पदवी मिळाली.

प्रा. मा. रा. लामखडे

ग्रामीण साहित्य संमेलन ही साहित्यविषयक नवी संकल्पना आणि त्याची चळवळ लामखडे यांनी सुरू केली. त्यांनी पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन बोटा येथे भरविले. त्यानंतर ग्रामीण साहित्याची चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. ठाकर या आदिवासी जमातीचा त्यांचा विशेष अभ्यास होता.

्द संपादन

लेखन कारकीर्द संपादन

स्वतंत्र लेखन संपादन

  1. चिमण्या चिवचिवल्या ललित लेखन -शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, २०००
  2. आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीते
  3. मज हिंडायची गोडी - प्रवास वर्णन - नवीन उद्योग, पुणे[१]
  4. कानडी मुलखातील मुशाफिरी,शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर २०००
  5. कार्यकर्त्यांचा आधार - साथी किशोर पवार - प्रकाशक : समीर लामखडे
  6. संत गाडगेबाबा - राष्ट्रसेवा दल, पुणे
  7. लोकपरंपरेची सत्त्वधारा, नवीन उद्योग, पुणे
  8. तमाशा आणि लावणी - नवीन उद्योग, पुणे
  9. बाबुराव बागुल : कार्यकर्ता लेखक, नवीन उद्योग, पुणे
  10. प्रवास दक्षिणा, नवीन उद्योग, पुणे

संपादन संपादन

  1. शेती आणि सहकार (सहसंपादक रावसाहेब कसबे)समता व ग्रामविकास विचार व्यासपीठ संगमनेर
  2. मी, बाबुराव घोलप (सहसंपादक रावसाहेब कसबे) समता व ग्रामविकास विचार व्यासपीठ संगमनेर

संदर्भ संपादन

  1. ^ भाग्यश्री बोरगांवकर (९ ऑक्टोबर २०१२). "बुकशेल्फ". साप्ताहिक सकाळ. Archived from the original on 2016-03-04. १३ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन