श्रीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगरच्या खालोखाल आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे, पण लहान शहर आहे. श्रीरामपूरचे भोगोलिक स्थान अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व तालुक्यांना सोईस्कर असे आहे. त्यामुळे कामासाठी श्रीरामपूरला भेट देणाऱ्या नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत नाही.

श्रीरामपूर
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या 1,89,832
2011
दूरध्वनी संकेतांक +91 2422
टपाल संकेतांक 413 709
वाहन संकेतांक MH-17
संकेतस्थळ shrirampurmc.gov.in
Disambig-dark.svg
हा लेख श्रीरामपूर शहराविषयी आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या माहितीसाठी पहा, श्रीरामपूर तालुका


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.श्रीरामपूरजवळच्या बेलापूर येथे भारतातील पहिला साखर कारखाना झाला. त्यामुळे श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजनाअगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते.

श्रीरामपूर तालुक्यात ५२ गावांचा समावेश आहे. तालुक्याचा दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था व रेल्वेची उपलब्धता आहे. नवीन कार्यालयांसाठी लागणारी सरकारी जागा विपुल प्रमाणात आहे.

श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा येथे नवसाला पावणारा गणपती आहे. हे गाव रम्य निसर्गासाठी आणि मोरांसाठी प्रसिद्ध आहे. श्रीरामपूरमधील दत्तनगर येथे एम आय डी सी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) आहे.

श्रीरामपूरचे टाऊन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन एकमेकांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. गावात उत्तम नागरी व्यवस्था, स्वच्छता आणि मुबलक पाणीपुरवठा असल्याने श्रीरामपूरच्या स्थानिकांचे जीवनमान चांगले आहे.

श्रीरामपूर येथे अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असे सरकारी व खाजगी दवाखाने आहेत.

श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत.

श्रीरामपूर मध्ये नगरपरिषद आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा