देवगड (नेवासा)
देवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे. अहिल्यानगरपासून सुमारे ६६ कि.मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. सदर मंदिर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प.प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

संपूर्ण देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदिर आहे. संपूर्ण भव्य मंदिर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत.[१]

माहिती
संपादनदेवगड हे नेवाशापासून १४ कि. मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवस्थान आहे. सदर देवस्थान प. पु. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केले तर या क्षेत्राचा विकास श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केला आहे.
देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून भव्य असे प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेते. येथील प्रमुख मंदिर हे दत्तमंदिर आहे. संपूर्ण मंदिर राजस्थानहून आणलेल्या संगमरवरी दगडातून बांधण्यात आले असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. मंदिर परिसरात शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्री किसनगिरी महाराजांचे समाधी स्थान आहे.
मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी वाहते. येथे नदीवर भक्कम असा घाट बांधण्यात आला असून नौकानयनाची सोय उपलब्ध आहे.
मंदिर परिसरात निवास आणि भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. देवगडला प्रत्येक गुरुवार, एकादशी, दत्तजयंती, महाशिवरात्र, किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
देवगडला जाण्यासाठीचे मार्ग
संपादनरेल्वे - अहिल्यानगर ,छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, शिर्डी ही देवगडला येण्यासाठी सोयिस्कर अशी रेल्वेस्थानके आहेत.
अहिल्यानगर - देवगड ६६ कि.मी
छत्रपती संभाजीनगर - देवगड ५३ कि. मी
श्रीरामपूर - देवगड ५० कि.मी
शिर्डी - देवगड ७० कि.मी
बस सेवा
अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील देवगड फाटा येथून फक्त ५ कि.मी अंतरावर देवगड देवस्थान आहे