मानुषी छिल्लर (जन्मः रोहतक (हरियाणा, भारत), १४ मे, १९९७ - ) ही भारतीय मॉडेल असून २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने फेमिना मिस इंडिया २०१७ हा किताब २५ जून २०१७ रोजी मिळवला होता. मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.[१][२]

मानुषी छिल्लर
जन्म १४ मे १९९७
बामनोली, जझ्झर , हरियाणा , भारत
प्रशिक्षणसंस्था भगत फूल सिंघ मेडिकल कॉलेज
पेशा मॉडेल , अभिनेत्री , विश्वसुंदरी किताब विजेती
कारकिर्दीचा काळ २०१७- चालू
उंची १. ७५ मीटर ( ५ फुट ९ इंच )
पुरस्कार

फेमिना मिस इंडिया २०१७ (विजेती) ,

मिस वर्ल्ड २०१७ (विजेती)
स्वाक्षरी


शिक्षण संपादन

मानुषीचे शिक्षण नवी दिल्लीतील सेंट थॉमस स्कूल येथे झाले. आणि सध्या ती सोनेपत येथील भगत फूलसिंग सरकारी महिला वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. राजा आणि राधा रेड्डी व कौशल्या रेड्डी या प्रसिद्ध कलाकारांकडून तिने कुचीपुडी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

कौटुंबिक माहिती संपादन

मानुषीचे वडील डॉ. मित्र बासू छिल्लर, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात, तर आई डॉ. नीलम छिल्लर या इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर ॲन्ड अलाईड सायन्सेसच्या न्यूरोकेमिस्ट्री विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ "Haryana girl brings back the coveted 'blue crown' to India". The Sunday Guardian. 8 December 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "मानुषी छिल्लर: मिस इंडिया से मिस वर्ल्ड तक". BBC News हिंदी (इंग्रजी भाषेत). 2017-11-19. 2018-04-16 रोजी पाहिले.