माधवी सरदेसाई
माधवी सरदेसाई (मृत्यू २२ डिसेंबर २०१४, गोवा) या कोकणी भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका होत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या मंथन या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले.
Indian academic | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Madhavi Sardesai | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जुलै ७, इ.स. १९६२ लिस्बन | ||
मृत्यू तारीख | डिसेंबर २२, इ.स. २०१४ गोवा | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
माधवी सरदेसाई या जाग नावाच्या कोकणी साहित्यविषयक मासिकाच्या संपादक होत्या. त्या पणजी येथील गोवा विद्यापीठात कोकणीच्या प्राध्यापिका होत्या.
पुस्तके
संपादन- एका विचाराची जीवन कथा (महात्मा गांधींच्या जीवनावर आधारलेले पुस्तक, भाषांतरित). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार मिळाला.
- भासाभास (१९९३). या पुस्तकाला कोकणी भाषामंडळाचा एन.डी. नाईक पुरस्कार मिळाला.
- मंथन (निबंधसंग्रह, २०१२)
- माणकुलो राजकुमार (अनुवादित)
पुरस्कार
संपादन- एन.डी. नाईक पुरस्कार
- साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)