माथियू केरेकू (फ्रेंच: Mathieu Kérékou; २ सप्टेंबर १९३३) हा पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. केरेकू १९७२ ते १९९१ व १९९६ ते २००६ ह्या दोन वेळेंना राष्ट्रप्रमुख होता. केरेकूच्या नेतृत्वाखाली १९७५ ते १९९० दरम्यान बेनिन देश मार्क्सवादी--लेनिनी बेनिनचे जनतेचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. १९९० सालच्या क्रांतीनंतर १९९१ साली केरेकुला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले परंतु १९९६ सालची निवडणुक जिंकुन तो पुन्हा राष्ट्राध्यक्षपदावर आला.

माथियू केरेकू
Mathieu Kérékou 2006Feb10.JPG

बेनिन ध्वज बेनिनचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
४ एप्रिल १९९६ – ६ एप्रिल २००६
मागील निसेफोर सोग्लो
पुढील यायी बोनी
कार्यकाळ
२६ ऑक्टोबर १९७२ – ४ एप्रिल १९९१
मागील जस्टिन अहोमदेग्बे-तोमेतिन
पुढील निसेफोर सोग्लो

जन्म २ सप्टेंबर, १९३३ (1933-09-02) (वय: ८९)
कूआर्फा, फ्रेंच दहोमी (आजचा बेनिन)
धर्म ख्रिश्चन