माझांदारान प्रांत

(माझांदारान या पानावरून पुनर्निर्देशित)


माझांदारान (फारसी: اُستان مازندران‎‎) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून सारी शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेला माझांदारान इराणमधील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या प्रांतांपैकी एक आहे. मासेमारी व खनिज तेल हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

माझांदारान
اُستان مازندران‎
इराणचा प्रांत

माझांदारानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
माझांदारानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी सारी
क्षेत्रफळ २३,८४२ चौ. किमी (९,२०५ चौ. मैल)
लोकसंख्या २९,२२,४३२
घनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-02

अलबुर्ज पर्वतरांगेमधील माउंट दमावंद हे आशियामधील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर ह्याच प्रांतामध्ये आहे.

बाह्य दुवे

संपादन