मागाठाणे विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघ - १५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मागाठाणे मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७३, १८७३ आणि वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक २१३ ते ३५६, ४८२ ते ५०१ आणि ५१९ ते ५२५ समावेश होतो. मागाठाणे हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे प्रकाश राजाराम सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | प्रकाश राजाराम सुर्वे | शिवसेना | |
२०१४ | प्रकाश राजाराम सुर्वे | शिवसेना | |
२००९ | प्रविण यशवंत दरेकर | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
निवडणूक निकाल
संपादनविजयी
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मागठाणे | ||
उमेदवार | पक्ष | मत |
प्रविण यशवंत दरेकर | मनसे | ५८,३१० |
प्रकाश सुर्वे | राष्ट्रवादी काँग्रेस | ४५,३२५ |
अशोक जी. नार | शिवसेना | ३५,८८३ |
दिवाकर गोंदणे | बसपा | १,७५५ |
राजेश जिलेदार सिंग | अपक्ष | १५६२ |
मोहम्मद सबिर सिध्धिक मलिक | अपक्ष | १४०७ |
अध्यान बंडू शेंडगे | रासप | ७७७ |
दिपक दत्तात्रय अरे | अपक्ष | ७६४ |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".