माइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइंत्स ऱ्हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणाऱ्या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला.

माइंत्स
Mainz
जर्मनीमधील शहर


चिन्ह
माइंत्स is located in जर्मनी
माइंत्स
माइंत्स
माइंत्सचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°00′00″N 8°16′16″E / 50.00000°N 8.27111°E / 50.00000; 8.27111

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य ऱ्हाइनलांड-फाल्त्स
क्षेत्रफळ ९७.८ चौ. किमी (३७.८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १९,७,७७८ (इ.स. २००९)
  - घनता २,०२३ /चौ. किमी (५,२४० /चौ. मैल)
http://www.mainz.de/

बाह्य दुवे

संपादन