महाविद्या
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महाविद्या (संस्कृत: महाविद्या : IAST: Mahāvidyā ; इंग्रजी : great wisdom goddess. )हिंदू धर्मातील आदिशक्तीच्या दहा पैलूंचा समूह आहे. ते सर्व पार्वती देवीचे रूप आहेत.देवीचे हे रूप कौल तंत्र साहित्यात उल्लेख आढळते. १० महाविद्या म्हणजे काली, तारा(हिंदू देवी), त्रिपुर सुंदरी (षोडशी), भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलात्मिका.
देवी-भागवत पुराणांसारख्या[१] ग्रंथांनी, विशेषतः सातव्या स्कंधातील शेवटचे नऊ अध्याय (३१-४०), ज्यांना देवी गीता म्हणून ओळखले जाते आणि हे लवकरच शाक्तपंथाचे मध्यवर्ती ग्रंथ बनले. शाक्त महा-भागवत पुराणातील एका कथेत, सर्व महाविद्यांच्या निर्मितीचे वर्णन केले आहे, दक्षाची कन्या आणि भगवान शिवाची पहिली पत्नी सती यांना अपमान वाटते की तिला आणि शिवाला दक्ष यज्ञात आमंत्रित केले गेले नाहीआणि शिवाचा निषेध असूनही तिथे जाण्याचा आग्रह धरतो. शिवांना पटवून देण्याच्या व्यर्थ प्रयत्नांनंतर संतप्त सती महाविद्यामध्ये रूपांतरित होते, ज्यांनी शिवाला दहा मुख्य दिशांनी वेढले आहे.[२]
दुर्गासप्तशती[३],वृहद्धर्म पुराणमध्ये दशमहाविद्याच्या उत्पत्तीविषयीची कथा सांगितली आहे.[४]
शाक्तपंथामध्ये महाविद्याला महाकालीचे रूप मानले जाते.महाविद्याला निसर्गात तांत्रिक मानले जाते आणि सहसा अशी ओळख दिली जाते:[२]
दश महाविद्या
संपादन- कालिका
- तारा(हिंदू देवी)
- छिन्नमस्ता
- षोडशी (त्रिपुरसुंदरी)
- भुवनेश्वरी
- त्रिपुरभैरवी
- धूमावती
- बगलामुखी
- मातंगी
- कमलात्मिका
हे सर्व महाविद्या मणिद्वीपमध्ये राहतात.[२]
संस्कृत भाषा शब्द - महा अर्थात महान, विशाल आणि विद्या अर्थात ज्ञान.
संदर्भ यादी
संपादन- ^ "देवीभागवतपुराणम् - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2020-01-19 रोजी पाहिले.
- ^ a b c "Mahavidya". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-06.
- ^ Nipanekar, Vijay (2019-11-28). आदिशक्ती राजराजेश्वरी श्री सप्तश्रृंगी माता. Vijay Nipanekar.
- ^ "Navaratri - The famous Hindu festival". artstudio.co.za. 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-19 रोजी पाहिले.
- ^ a b "महाविद्या". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-03.