छिन्नमस्ता
छिन्नमस्ता ही देवी पार्वतीचे रूप असून दहा महाविद्यांपैकी एक आहे. या देवीचे प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका[१] असेही अनेक नावे आहेत.
छिन्नमस्ता | |
मराठी | छिन्नमस्ता |
निवासस्थान | श्मशान |
शस्त्र | कट्यार |
पती | शिव (कबन्ध) छिन्नमस्तक |
या अवताराची मुख्य देवता | पार्वती (महाविद्या) |
या देेेवीच्या एका हातात तिचे मस्तक व एका हातात शस्त्र आहे. गळ्यात हाडकांची माळ आहे. यज्ञात छिन्नमस्ता देवीला आवाहन केल्यास तिचे डोके तिच्या धडावर येते.
छिन्नमस्ता जयंती ही वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते.
हिंदू धर्मातील देवी-केंद्रित परंपरेनुसार शाक्त पंथातील कालीकुला संप्रदायामध्ये छिन्नमस्ताची पूजा करतात. जरी छिन्नमस्ता देवी हिला महाविद्यांपैकी एक म्हणून संरक्षित स्थान प्राप्त झाले असले तरी तिची मंदिरे मुख्यतः नेपाळात आणि पूर्व भारतात आढळतात, आणि तिची सार्वजनिक पूजा दुर्लभ आहे. ती एक तांत्रिक देवता आहे आणि गूढ तांत्रिक अभ्यासक तिची उपासना करतात. 'छिन्नमस्ता ही चिन्नमुंडाशी संबंधित आहे - ती तिबेट बौद्ध देवी वज्रयोगिनीचे तुच्छ-मुंडक रूप आहे. शाक्तपंथमतानुसार छिन्नमस्ताची उपासना करणारे राहूच्या प्रभावापासून मुक्त होतात.[१]
मंदिरे
संपादनछिन्नमस्ता भगवती मंदिर[२]-छिन्नमस्ता भगवती हे नेपाळमधील सप्तरी जिल्ह्यातील राजविराजच्या दक्षिणेस सीमावर्ती भागात असलेल्या छिन्नमस्ताच्या सखडा गावात आहे.[३]
छिन्नमास्तिका (प्रचंडचंडिके[४]) मंदिर [५]- रजरप्पा[४] ,रामगढ जिल्हा,झारखंड
छिन्नमास्तिका मंदिर विष्णूपुर ,पश्चिम बंगाल.
संदर्भ यादी
संपादन- ^ a b "Chhinnamasta". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-18.
- ^ "Chinnamasta Bhagawati Temple". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-24.
- ^ "छिन्नमस्ता भगवती". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-02-03.
- ^ a b "रजरप्पा". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-06-27.
- ^ "Chhinnamasta Temple". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-10-31.