मोहम्मद हमीद अन्सारी
(महम्मद हमीद अन्सारी या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मोहम्मद हमीद अन्सारी (मराठी लेखनभेद: मोहम्मद हामिद अन्सारी ; उर्दू: محمد حامد انصاری ; रोमन लिपी: Mohammad Hamid Ansari ;) (एप्रिल १, इ.स. १९३७; कोलकाता, बंगाल - हयात) हे भारताचे माजी उपराष्ट्रपती आहेत. ११ ऑगस्ट, इ.स. २००७ ते ११ अॉगस्ट इ.स. २०१७ दरम्यान त्यांनी १२ व्या उपराष्ट्रपतीपदाती सूत्रे हाती घेतली होती. यापूर्वी त्यांनी भारतीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले होते. अन्साऱ्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारीपदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर ते अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती व इराण या देशांत भारताचे राजदूत होते. इ.स. १९८४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- भारतीय उपराष्ट्रपती कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)