मराठी अभ्यास परिषद
मराठी अभ्यास परिषद ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून ती १९८२ पासून कार्यरत आहे. दर वर्षी नियमितपणे, मराठी भाषेच्या हिताच्या, भाषाविकासाच्या आणि भाषासमृद्धीच्या अनुषंगाने पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, संमेलने, पुरस्कार-वितरण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होण्याचे काम संस्था करते. डॉ. अशोक केळकर हे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष होते.
संस्थेची उद्दिष्टे
संपादन(१) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे. (२) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे. (३) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. (४) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे वगैरे.
संस्थापक
संपादनडॉ.अशोक केळकर आणि मॅक्सिन बर्नसन हे संस्थेचे संस्थापक सदस्य होते.[१]
संस्थेचे अध्यक्ष
संपादनप्रा.अशोक रा. केळकर हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. [२]
प्रा.प्र.ना.परांजपे आणि सलील वाघ यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे.
०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीसाठी डॉ. आनंद काटीकर अध्यक्षपदी असणार आहेत.
संस्थेचे उपक्रम
संपादनमराठी अभ्यास परिषद ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून ती १९८२ पासून कार्यरत आहे. दर वर्षी नियमितपणे, मराठी भाषेच्या हिताच्या, भाषाविकासाच्या आणि भाषासमृद्धीच्या अनुषंगाने पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, संमेलने, पुरस्कार-वितरण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होण्याचे काम संस्था करते.
संस्थेचे विद्यमान उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत -
०१) मुखपत्राचे प्रकाशन
संपादन'भाषा आणि जीवन' हे भाषाविषयास वाहिलेले त्रैमासिक मराठी अभ्यास परिषद १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित करते. या त्रैमासिकाला अमेरकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा १९९५ सालचा पुरस्कार मिळाला आहे. या नियतकालिकात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, व भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य असते. अश्या प्रकारे भाषाचिंतनाला वाहिलेले इतक्या प्रदीर्घ काळ प्रकाशित होणारे भारतीय भाषांमधले हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक आहे.[ संदर्भ हवा ]
०२) प्रा० ना० गो० कालेलकर भाषाविषयक लेखन पुरस्कार
संपादनही मराठी अभ्यास परिषद कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला आणि लेखकांना २०१८ पासून दरवर्षी प्रा० ना.गो. कालेलकर यांच्या नावे परिषद पुरस्कार देते. २०१८ सालचा, रु २५,००० व सन्मानपत्र अशा स्वरूपाचा पुरस्कार प्रा० डाॅ० नरेश नाईक यांच्या 'सामवेदी बोली : संरचना आणि स्वरूप' या ग्रंथाला दिला गेलेला आहे.[ संदर्भ हवा ]
याआधी हा पुरस्कार 'महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार' या नावाने दिला जात होता.
- याआधी पुरस्काराने सन्मानित झालेले काही लेखक, संपादक प्रकाशक आणि ’ग्रंथ’ असे
’अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी’ (लेखक शं.गो. तुळपुळे आणि Anne Feldhaus), प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर, द.न. गोखले, वसंत आबाजी डहाके, शं.गो. तुळपुळे, डॉ. सदाशिव देव, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. द.दि. पुंडे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ’पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ (लेखक पं. वामनशास्त्री भागवत), डॉ. मिलिंद मालशे, ’केशवसुतांच्या कवितेचा शैलीचा वैज्ञानिक अभ्यास’ (डॉ. शकुंतला क्षीरसागरांचा अप्रकाशित प्रबंध), सामवेदी बोली (प्रा० नरेश नाईक).[ संदर्भ हवा ]
०३) चर्चासत्रांचे आयोजन
संपादन- भाषाविषयक प्रश्नांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण व आकलन यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने. उदा.
- त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन
- भाषिक नीती आणि व्यवहार
- प्रसार-माध्यमे आणि मराठीचा विकास
- पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन
०४) वार्षिक कार्यक्रम
संपादन- १ मे हा परिषदेचा स्थापना दिन. या दिवशी भाषाव्यवहार, भाषाभ्यास, भाषाजीवन असे विषय केंद्रस्थानी ठेवून व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र आयोजित केले जाते.
- सत्त्वशीला सामंत स्मृती व्याख्यान. प्रसिद्ध भाषाभ्यासक व शुद्धलेखन तज्ज्ञ दिवंगत डाॅ. सत्त्वशीला सामंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भाषाभ्यासाच्या व्याकरण, कोशकार्य, शुद्धलेखन इत्यादी पैलूंविषयी चर्चा करणारे व्याख्यान आयोजित केले जाते.
- प्रा० डाॅ० ना.गो. कालेलकर भाषाविषयक लेखन पुरस्कार समारंभ. यात पुरस्कृत लेखनविषयी व्याख्यान, परिसंवाद, सादरीकरण आयोजित केले जाते.
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा २०२२ या वर्षीचा अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार मराठी अभ्यास परिषदेला मिळाला.[२]
बाह्य दुवा
संपादन- संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-04-17 at the Wayback Machine.