मराठी नाटकातील दुहेरी भूमिका

एकाच मराठी नाटकात दुहेरी किंवा एकाहून अधिक भूमिका करणारे बरेच नट आहेत. अशा काही नाटकांची आणि त्यातील अनेकविध भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव खालील यादीत दिले आहे.

नाटकाचे नाव (अभिनेता-भूमिकांची संख्या) संपादन

  • गंमत जंमत (अरुण नलावडे - विविध)
  • गंमत जंमत (रसिका ओक - विविध)
  • गंमत जंमत (सोनाली चेऊलकर - विविध)
  • चूक भूल द्यावी घ्यावी (निर्मिती सावंत - ३, राजाभाऊंच्या सासूबाई/प्रेयसी-राजाभाऊंची मैत्रीण/दाक्षिणात्य शेजारीण)
  • जेव्हा यमाला डुलकी लागते (सुधा करमरकर - २ स्वतंत्र भूमिका)
  • तो मी नव्हेच (प्रभाकर पणशीकर - ५, लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार (दिवाकर दातार यांचा मोठा भाऊ), कॅप्टन अशोक परांजपे (परांजपेंकडे दत्तक गेलेला दिवाकर दातार यांचा धाकटा भाऊ), राधेश्याम महाराज). प्रभाकर पणशीकर यांनी या नाटकाचे 'अवनु ननल्ला' (Avanu Nanalla) या नावाने कन्नडमध्ये भाषांतर करून घेतले होते. कन्नड नाटकातही तेच भूमिका करत होते.
  • थरार (सतीश पुळेकर - २)
  • प्यार किया तो डरना क्या (पुरूष कलाकार - ३, बिरबल/ जॉर्ज बुश/मूर्तिकार)
  • बहुरूपी (प्रशांत दामले - २, बहुरूपी सदा इंगवले/प्रशांत दामले)
  • बे दुणे पाच (प्रशांत दामले - ५)
  • मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (पुरुष कलाकार - २, हिटलर/हिटलरचा तोतया)
  • रणांगण (स्त्री कलाकार - २ किंवा ३)
  • रथचक्र (रोहिणी हट्टंगडी - २स्वतंत्र भूमिका)
  • श्रीमंत दामोदर पंत - (भरत जाधव - २, स्वतः आणि दामोदरपंत आजोबा)
  • सही रे सही (भरत जाधव - ४, गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा, वेडसर मुलगा)
  • हलकं फुलकं (रसिका ओक - विविध)
  • हलकं फुलकं (विजय कदम - विविध)
  • हसवाफसवी (दिलीप प्रभावळकर - ६; चिमणराव जोग/प्रिन्स वांटुंग पिन पिन/नाना पुंजे/दीप्ती प्रभावळकर-पटेल-लुमुम्बा/बॉबी मॉड/कृष्णराव हेरंबकर