मनोज कायंदे ( Manoj Kayande )(जन्म: २३ जून १९८९) हे भारतीय राजकारणी असून, महाराष्ट्र विधानसभाच्या १५व्या सभासदामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ (जि. बुलढाणा) येथून आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न आहेत.

मनोज देवानंद कायंदे ( Manoj Devanand Kayande )
Manoj Kayande, Member of Legislative Assembly (MLA) from Sindkhed Raja, Maharashtra
आमदार, महाराष्ट्र विधानसभा
Assumed office
२०२४
Constituency सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ
वैयक्तिक माहिती
जन्म २३ जून, १९८९ (1989-06-23) (वय: ३५)
देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पती/पत्नी वर्षा मनोज कायंदे
पत्ता देऊळगाव राजा, बुलढाणा
शिक्षण बी.ए. (कला शाखा)
शिक्षणसंस्था संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
Profession आमदार


प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

संपादन

मनोज देवानंद कायंदे यांचा जन्म २४ जून १९८९ रोजी उंबरखेड, देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील देवानंद खंडुजी कायंदे आणि आई नंदाताई देवानंद कायंदे या माजी जिल्हा परिषद बुलढाणा अध्यक्ष राहिल्या आहे. मनोज कायंदे यांना एक भाऊ आहे, सतीश देवानंद कायंदे. मनोज कायंदे यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा हायस्कूल, देऊळगाव राजा येथे झाले. २०१४ साली त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठशी संलग्न श्री व्यंकटेश कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून बी.ए. (कला शाखा) पदवी प्राप्त केली.

राजकीय कारकीर्द

संपादन

मनोज कायंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून केली. मात्र, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केला. ते यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विरोधी पक्ष नेते होते. सध्या ते सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार आहेत. १५व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी एनसीपी (शरदचंद्र पवार) पक्षाचे डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचा ४,६५० मतांच्या फरकाने पराभव केला.

२०२४ निवडणूक निकाल (सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ)

संपादन
  • एकूण मते: ७३,४१३
  • मनोज कायंदे यांना मिळालेले मते: ३१.८५%


विकासदृष्टी आणि भावी योजना

संपादन


मनोज कायंदे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघाच्या विकासासाठी पुढील महत्त्वाच्या योजना सादर केल्या आहेत:

१. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन

संपादन
  • जिजाऊ जन्मभूमी राष्ट्रीय स्मारक: मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मभूमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक म्हणून विकसित करणे.
  • जिजाऊ महोत्सव: जिजाऊ महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पर्यटनाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

२. शेती आणि शेतकरी विकास

संपादन
  • "बियाणे शहर" प्रकल्प: देऊळगाव राजा येथे रोजगारनिर्मितीसाठी सवलती आणि सुधारित सुविधा उपलब्ध करणे.
  • शेत रस्ते आणि अतिक्रमण समस्यांचे निराकरण.
  • वन्यजीवांच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना.

३. पाणी व्यवस्थापन

संपादन
  • खडकपूर्णा उजव्या कालव्याचा विस्तार: सिंचन क्षमता वाढवणे.

४. समाज विकास

संपादन
  • बंजारा समाजासाठी सांस्कृतिक केंद्र: बंजारा समाजासाठी सांस्कृतिक केंद्र उभारणे.
  • अल्पसंख्याक समाजासाठी आयटीआय: प्रशिक्षण संस्था स्थापन करणे.

५. स्थापत्य आणि स्थानिक विकास

संपादन
  • पंचायत समिती कार्यालयांचे बांधकाम.
  • स्मार्ट सिटी विकास: सिंदखेड राजा आणि दुसरबीडला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणे.
  • जलसंवर्धन प्रकल्प: प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे.

६. आरोग्य आणि नागरिक कल्याण

संपादन
  • शासकीय रुग्णालय: सिंदखेड राजा येथे मोठे शासकीय रुग्णालय उभारणे.
  • मोफत रुग्णवाहिका सेवा: सुरू करणे.

७. धार्मिक आणि तीर्थक्षेत्र विकास

संपादन
  • संत चोखामेळा जन्मस्थळ: सामाजिक प्रेरणा केंद्र म्हणून विकास.
  • बालाजी मंदिर: देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिराला तिरुपतीच्या धर्तीवर विकसित करणे.

८. वाहतूक आणि संपर्क सुधारणा

संपादन
  • जालना-सिंदखेड रेल्वे मार्ग, देऊळगाव राजा-देऊळगाव माही रेल्वे मार्ग: पूर्ण करणे.
  • स्थानिक रेल्वे स्थानकांचे उन्नतीकरण.

९. युवक सक्षमीकरण

संपादन
  • प्रशिक्षण केंद्रे: शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन, आणि एआय क्षेत्रासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे.
  • रोजगारनिर्मिती: बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

१०. शिक्षण क्षेत्राचा विकास

संपादन
  • वैद्यकीय, नर्सिंग, अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी महाविद्यालये: उभारणे.
  • साहसी क्रीडा केंद्रे: आणि शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती.

वैयक्तिक जीवन

संपादन

मनोज कायंदे यांचा विवाह वर्षा मनोज कायंदे यांच्यासोबत झाला आहे. ते देऊळगाव राजा, बुलढाणा येथे राहतात.

संपर्क माहिती

संपादन
  • पत्ता:
 देऊळगाव राजा, जि. बुलढाणा, महाराष्ट्र - ४४३२०४  
  • मतदार नोंदणी क्रमांक:
 सिंदखेड राजा मतदारसंघ, क्रमांक ६०६, भाग क्रमांक १६०  

बाह्य दुवे

संपादन
  • Manoj Kayande Official Social Media Handles
  • मनोज कायंदे यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स

संदर्भ

संपादन

Election Commission Of India Results

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S1324.htm

Times Of India News Article

https://timesofindia.indiatimes.com/elections/assembly-elections/maharashtra/constituency-show/sindkhed-raja

India Today News Article

https://www.indiatoday.in/elections/assembly/maharashtra/sindhkhed-raja-constituency-result-13024

News18

https://www.news18.com/amp/elections/sindkhed-raja-election-result-2024-live-leading-winner-mla-9129968.html

Ndtv

https://www.ndtv.com/elections/maharashtra-assembly-election-results-2024/sindkhed-raja