भिल्ल समाज हा भारतातील एक मुख्य आदिवासी समूह आहे. त्यांना विविध भाषांत भिला किंवा भिल्ल गरासिया असे म्हणतात. भिल्ल हे मध्य भारतातील एका जमातीचे नाव आहे. भिल्ल जमात ही भारतातील सर्वात व्यापक जमात आहे. प्राचीन काळी, हे लोक इजिप्त पासून लंकेपर्यंत पसरले होते . भिल्ल जमातीचे लोक भिल्ल भाषा बोलतात. भिल्ल जमातीला " भारताचे शूर धनुष्य पुरुष" असे संबोधले जाते . या वंशाची राजवट डोंगराळ भागात होती भिल्ल राजांची सत्ता प्रामुख्याने माळवा , दक्षिण राजस्थान , गुजरात ओडिशा आणि महाराष्ट्र होती . भिल्ल गुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड , महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमाती आहे . अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्याचे खादिम हे देखील भिल्ल पूर्वजांचे वंशज आहेत. त्रिपुराचे भिल्ल आणि पाकिस्तानचे सिंधके थारपारकरही जिल्ह्यात स्थायिक आहे. भिल्ल जमात भारतासह पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. प्राचीन काळी शिवी जिल्ह्यात भिल्ल जमातीची राजवट प्रस्थापित झाली होती, ज्याला सध्या मेवाड म्हणतात, अलेक्झांडरने मींदर मार्गे भारतावर आक्रमण केले, तेव्हा पंजाब आणि शिवी जिल्ह्यातील भिल्ल राज्यकर्त्यांनी जगविजेत्या सिकंदरला भारतात येऊ दिले नाही. त्याला रोखले आणि परत जावे लागले.

भिल्ल समाजातील एक स्त्री

भील राजा

संपादन
  • राजा ठाना भील - राजा ठाणा भिल हा बुलढाण्याचा राजा होता
  • नवापूर च्या रायगण. सुभ्यावर ठिंगळे या भिल सरदार यांनी राज्य केले १८५७ लां ब्रिटिश सरकार विरूद्ध भील उठाव केला

तडवी भिल्ल समाज हा महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आढळतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अजिंठा डोंगर पायथ्याशी वाढोना गावात सर्वात जास्त तडवी भिल्ल मोठ्या प्रमानात व पारध बुद्रुक, पारध खुर्द, कोसगाव, भोकरदन, अंबड, घनसावंगी,टाका,खालापुरी, धनगर पिंप्री, लिंगेवाडी, वाकडी, वढोद तांगडा, पद्मावती, धावडा, सेलूद, लिहा, पोखरी, जळगाव सपकाळ, हिसोडा, देहेड, खंडाळा, भोरखेडा, दहिगाव याठिकाणी या समाजाची वस्ती आहे. बुलढाणा जिल्ह्याला पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखायचे बुलढाणा तालुक्यात जामठी, दहिद बुद्रुक, दहिद. खुर्द, गिरडा, गोधनखेडा आणि मढ तसेच संग्रामपुर तालुक्यात आलेवाड़ी, चीचारी, वसाडी, सायखेड, पिंगळी ह्या भील वस्त्या आहेत. तसेच जळगाव तालुक्यात रसूलपूर, वडगाव, इस्लामपूर,सुनगाव, उमापूर, व जोंधनखेड तसेच अकोला अमरावती जिल्ह्य़ात भील वस्त्या आहेत; जळगाव जिल्ह्यातथल जामनेर तालुक्यात खूप जास्त प्रमाणात तडवी भिल्ल या समाजाची वस्ती आहे. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल जात प्रमुख आहे. येथे गायकवाड, मोरे, बर्डेभील साबळे, पवार, गांगुर्डे, सोनावणे, राठवा, पिंपळे, ठिंगळे, गावित, पाडवी, वसावा, वळवी, नाईक, मावंची, पावरा, परडके, []इत्यादी आडनाव असणारे भिल्ल आढळून येतात. त्यांची वस्ती मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान दादरा नगर हवेली, दमन व महाराष्ट्र या राज्यांतही आहे. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जे विविध उठाव झाले त्यामध्ये भिल्ल समाजाने केलेला उठाव हा देखील अतिशय मोलाचा मानला जातो १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वासुदेव बळवंत फडके यांनी प्रस्थापितांविरोधात केलेला उठाव, तसेच नवापूरच्या रायगण सुभ्यातील ठिंगळे सरदार यांनी भील लोक यांचा उठाव, खाज्या नाईक, टंत्या भील, असे व अन्य लहान-मोठे उठाव संपूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजी सत्तेला यश मिळाले. मात्र भिल्ल समाजाने स्वसंस्कृतीची जोपासना आणि अधिकाराचे जतन करण्यासाठी लढा उभारला त्याला पूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजांना यश मिळाले नाही. ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील महाराष्ट्रामध्ये भिल्लांचा उठाव ही महत्त्वपूर्ण चळवळ राहिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आदिवासी व भिल्लांचे उठाव हे महत्त्वाचे पर्वत ठरलेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या उठावांना विशेष महत्त्व आहे. या उठावांतील समुदाय यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला तो संघर्ष आपली संस्कृती आपल्या परंपरा व आर्थिक हित कायम ठेवण्यासाठीचा संघर्ष होता ब्रिटिश सत्तेला हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामधील या उठावांचे विशेष महत्त्व आहे. .

महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकलव्य भिल्ल समाज संघटना कार्य करते. महाराष्ट्रातील एकलव्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे


  1. ^ Semwal, Manisha; Irfan, Shaik; Harshitha Sai, Edupuganti; Agnes, Mwali; Vurrinkala, Sankara Krishna (2024-12-31). "The Impact of Social Media Influencers on Customers Buying Behaviour Pattern". International Journal of Advance Research and Innovation. 12 (4): 40–45. doi:10.69996/ijari.2024021 Check |doi= value (सहाय्य). ISSN 2347-3258.