भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२
भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. मिताली राज हिने घेतलेल्या निवृत्तीमुळे हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदी नेमण्यात आले.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२ | |||||
श्रीलंका महिला | भारत महिला | ||||
तारीख | २३ जून – ७ जुलै २०२२ | ||||
संघनायक | चामरी अटापट्टू | हरमनप्रीत कौर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | निलाक्षी डि सिल्व्हा (१२३) | शफाली वर्मा (१५५) | |||
सर्वाधिक बळी | इनोका रणवीरा (६) | रेणुका सिंग (७) | |||
मालिकावीर | हरमनप्रीत कौर (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चामरी अटापट्टू (१३९) | हरमनप्रीत कौर (९२) | |||
सर्वाधिक बळी | इनोका रणवीरा (६) | राधा यादव (४) | |||
मालिकावीर | हरमनप्रीत कौर (भारत) |
भारताने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसरा सामन्यात देखील विजय मिळवत भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग बारावा ट्वेंटी२० विजय नोंदवला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार चामरी अटापट्टूच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने भारताचा ७ गडी राखून पराभव केला, हा श्रीलंकेचा मायदेशातील भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी२० विजय होता. भारतीय महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
भारताने पहिला महिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात भारताने १७४ धावांचे लक्ष्य एकही गडी बाद न होता पार केले. महिला वनडे सामन्यांमध्ये एकही गडी बाद न होता पाठलाग केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. तिसऱ्याही सामन्यामध्ये विजय मिळवत भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन
२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
भारत
१७६/६ (३८ षटके) | |
- नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
- रश्मी डि सिल्व्हा (श्री) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत महिला - २, श्रीलंका महिला - ०.
२रा सामना
संपादनवि
|
भारत
१७४/० (२५.४ षटके) | |
स्म्रिती मंधाना ९४* (८३)
|
- नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- विश्मी गुणरत्ने (श्री) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत महिला - २, श्रीलंका महिला - ०.
३रा सामना
संपादनवि
|
श्रीलंका
२१६ (४७.३ षटके) | |
- नाणेफेक : श्रीलंका महिला, क्षेत्ररक्षण.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत महिला - २, श्रीलंका महिला - ०.