भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२
भारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २००१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २००१-०२ | |||||
दक्षिण आफ्रिका | भारत | ||||
तारीख | १ ऑक्टोबर – २३ नोव्हेंबर २००१ | ||||
संघनायक | शॉन पोलॉक | सौरव गांगुली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हर्षल गिब्स (३१६) | सचिन तेंडुलकर (१९३) | |||
सर्वाधिक बळी | शॉन पोलॉक (१६) | जवागल श्रीनाथ (१३) | |||
मालिकावीर | हर्षल गिब्स (द) |
ह्या दौऱ्यावर ३-कसोटी सामन्यांच्या मालिका तसेच यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या दरम्यान त्रिकोणी मालिका खेळविली गेली.
कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.
१६ ते २० नोव्हेंबर २००१ दरम्यान सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ येथील कसोटीमध्ये सामनाधिकारी, माजी इंग्लिश खेळाडू माईक डेनेसने वादग्रस्त निर्णय देत भारताच्या सहा खेळाडूंना विविध गुन्ह्यांखाली दोषी ठरवले. डेनेसच्या ह्या निर्णयाचा भारतीय संघाने तीव्र निषेध केला. ह्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा करून तिसरी कसोटी अनधिकृत ठरवली आणि सेहवागवरील एका सामन्याची बंदी कायम ठेवली.
माईक डेनेसने कारवाई केलेले खेळाडू खालीलप्रमाणे
- सचिन तेंडूलकर: चेंडू कुरतडल्यामुळे एका कसोटीची बंदी
- विरेंद्र सेहवाग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
- सौरव गांगुली: संघाच्या वर्तणूकीवर अंकूश न ठेवता आल्याने एक कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी
- हरभजन सिंग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
- शिवसुंदर दास: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
- दीप दासगुप्ता: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
सराव सामने
संपादननिकी ओप्पनहेमर XI वि. भारतीय, रॅंडजेस्फोन्टेन, १ ऑक्टोबर २००१
निकी ओप्पनहेमर XI २४४/३घो; भारतीय २४५/५
भारतीय ५ गडी राखून विजयी
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ वि. भारतीय, बेनोनी, ३ ऑक्टोबर २००१
दक्षिण आफ्रिका अ २४१/६ (५०/५० षटके); भारतीय २४५/७ (४९.१/५० षटके)
भारतीय ३ गडी राखून विजयी
धावफलक
प्रथम श्रेणी: दक्षिण आफ्रिका बोर्ड अध्यक्षीय XI वि. भारतीय, डर्बन, २९-३१ ऑक्टोबर २००१
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
धावफलक
प्रथम श्रेणी: दक्षिण आफ्रिका अ वि. भारतीय, इस्ट लंडन, १०-१३ नोव्हेंबर २००१
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
धावफलक
स्टॅंडर्ड बँक त्रिकोणी मालिका
संपादनगुणफलक
संपादनसंघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
दक्षिण आफ्रिका | ६ | ५ | १ | ० | +१.२१० | २२ |
भारत | ६ | ३ | ३ | ० | +१.०१७ | १४ |
केन्या | ६ | १ | ५ | ० | -२.३१३ | ५ |
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन३–६ नोव्हेंबर २००१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
- कसोटी पदार्पण: दीप दासगुप्ता आणि विरेंद्र सेहवाग (भारत)
२री कसोटी
संपादन
अनधिकृत ३री कसोटी
संपादन
बाह्य दुवे
संपादन
१९९२-९३ | १९९६-९७ | २००१-०२ | २००६-०७ | २०१०-११ | २०११-१२ | २०१३-१४ |