भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
भारतीय क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने ऑगस्ट २०२० मध्ये नियोजित होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. तिनही सामन्यात विजय मिळवत भारताने वनडे मालिका ३-० ने जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२ | |||||
झिम्बाब्वे | भारत | ||||
तारीख | १८ – २२ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | रेगिस चकाब्वा | लोकेश राहुल | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (१४३) | शुभमन गिल (२८८) | |||
सर्वाधिक बळी | ब्रॅड एव्हान्स (५) | अक्षर पटेल (६) | |||
मालिकावीर | शुभमन गिल (भारत) |