वासुदेव वामन पाटणकर

मराठी शायर
(भाऊसाहेब पाटणकर या पानावरून पुनर्निर्देशित)

वासुदेव वामन पाटणकर, अर्थात "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते.

वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते.

इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला []. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [].

उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [].

शायरी व कार्यक्रम

संपादन

पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [].

रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी२९ डिसेंबरला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्याऱ्याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[]

भाऊसाहेब पाटणकर यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
पुस्तकाचे नाव प्रकाशनवर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशन
जिंदादिल
दोस्तहो इ.स. २००५ काव्यसंग्रह अरुण प्रकाशन
मराठी मुशायरा
मराठी शायरी
मैफिल उत्कर्ष प्रकाशन

सत्कार

संपादन

ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b "भाऊसाहेबांच्या पत्नी इंदूताई पाटणकर कालवश". २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ a b गंधे, आरती. "दोस्तहो..." २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)