रंगत संगत प्रतिष्ठान

रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातली सांस्कृतिक संस्था लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी ७ जून १९९२ रोजी स्थापन केली. ही संस्था दर महिन्याला विविध उपक्रम सतत सादर करत असते. नामांकित तसेच नवोदित, कलावतांना हक्काचे व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य ही संस्था अनेक वर्षे करत आहे. २०१७ सालापर्यंत या संस्थेचे ८००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. हे सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असतात.

आडकर यांचे वडील ज्ञानेश्वर आडकर हे प्रख्यात वकील होते, आई प्रतिभा आडकर शिक्षिका होत्या. दोघेही कवी होते. त्यांचे काव्यगुण प्रमोद आडकरंमध्येही उतरले आहेत. पण कवी असण्यापेक्षा ते कार्यक्रम संयोजक अधिक आहेत. आडकर टेरेसची जागा अपुरी पडायला लागल्यावर स्नेहसदन, पत्रकार भवन, निवारा, एस.एम. जोशी ओहाऊंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे कार्यक्रम होऊ लगले. आर्थिक अडचणीच्या कळातही प्रमोद आडकर यांनी हे व्रत चालूच ठेवले आहे. रंगत-संगत संस्थेचा एक स्वतंत्र काव्यविभाग आहे.

संस्थेचे उपक्रम संपादन

  • कवींना त्यांचे हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, संस्थेतर्फे दर महिन्याला एक काव्य विषयक उपक्रम, मोठया कवी संमेलनाचे आयोजन आणि दर वर्षाला दोन दिवसांचा भव्य राज्यव्यापी काव्य महोत्सव आयोजित केला जातो.
  • संस्थेने, मराठीतील ज्येष्ठ शायर यवतमाळचे भाऊसाहेब पाटणकर यांना पुण्यात आणून त्यांचा ५,००० पुणेकरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठया थाटात पार पाडला. हा सत्कार राजा गोसावी आणि ना.सं. इनामदार यांच्या हस्ते झाला.
  • अण्णा हजारे यांच्या "वाट ही संघर्षाची’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला. समारंभाला सुशीलकुमार शिंदे आणि आर.आर. पाटील उपस्थित होते.
  • संस्थेने नाटककार. वसंत कानेटकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित केला होता.
  • महिला ज्योतिष शास्त्रज्ञ प्रतिभाताई शाहू मोडक यांचा त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त, डॉ. विजय भटकर, डॉ. के.एच. संचेती, श्री. मोहन धारिया यांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणला.
  • गझलकार रमण रणदिवे यांना रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार समारंभाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष फ.मुं. शिंदे, उल्हास पवार, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य उपस्थित होते. (१३ डिसेंबर २०१४)
  • रंगत-संगततर्फे आदर्श आई पुरस्कार, काव्यप्रतिभा पुरस्कार, जिंदादिल पुरस्कार, कै.भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार, माणूस पुरस्कार, कै.माधव मनोहर पुरस्कार, वसंतराव कानेटकर स्मृती काव्यजीवन पुरस्कार, अंध व्यक्तीला देण्यात येणारा हेलन केलर पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारंसाठी रंगत संगतला भारत देसडला यांच्या श्यामची आई फाऊंडेशनचे सहकार्य लाभते.