भरहुत
भरहुत (भरहट) भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, जे तिथल्या बौद्ध स्तूप आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘भरहुत स्तूप’ सम्राट अशोकांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात निर्माण केला असावा, पण सुंग राजवटीदरम्यान अनेक शोभेच्छा पट्ट्या वापरून या स्तूपामध्ये कलाकुसरीच्या अनेक कामांची भर घातलेली आहे. कनिंघम यांनी इ.स. १८७३ मध्ये या प्राचीन स्थळाचा शोध लावला.
भरहुतमधील स्तूपाचे एक वैशिष्ट्य असे की, तेथील भिंतींवर किंवा दाराच्या लाकडी, अरूंद चौकटींवर काही मजकूर कोरलेला आहे, ज्यात अधिकतर काही व्यक्तींची ओळख दिलेली आहे. या स्तूपातील पुराणसंशोधनातल्या सर्व वस्तू आता कोलकात्याच्या वस्तुसंग्रहालयात नेऊन ठेवलेल्या आहेत.
चित्रदालनसंपादन करा
अनाथापिंडीका चित्रण
ग्रीक योद्ध्यासह वेदिका स्तंभ. भरहुत, मध्यप्रदेश, शुंग कालखंड, इ.स. १०० ते इ.स.पू. ८०. लालसर तपकिरी वाळूचा खडक[१] भारतीय संग्रहालय, कलकत्ता.
यक्ष सूट. भरहुत, इ.स.पू. दुसरे शतक.
हेही पहासंपादन करा
संदर्भ आणि नोंदीसंपादन करा
- ^ D.N. Jha,"Early India: A Concise History"p.150, plate 17