स्तूप

बौध्द धर्मातील शिल्परचना

स्तूप एक बौद्ध शिल्पस्मारक असून येथे चिंचन केले जाते. पॅगोडाप्रमाणे स्तूप सुद्धा बौद्ध अनुयायांचे एक प्रार्थना स्थळ म्हणजे विहार आहे. चैत्य हे विशेषतः मृत व्यक्तीसाठी बांधलेले जाते, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, केस इ. जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचत. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या अनुयायांनी त्यांच्या अस्थी, केस, रक्षा वाटून घेतली आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग जिथे घडले तिथे हे अवशेष पुरून त्यावर स्तूप बांधले. लुंबिनी, बोधगया, कुशीनगर अशा ठिकाणी हे स्तूप आहेत.[१] चैत्य या शब्दाचा अर्थ ढिगारा असा आहे.

धामेक स्तूप, सारनाथ

स्तूपाच्या ढिगाऱ्याला अंड म्हणतात. ज्या पात्रात अवशेष असतात त्याला दागोबा म्हणतात. माथ्यावर जी चौकोनी वेडी असते तिला हर्मिका म्हणतात . तिच्या भोवती कठडा असून वर छत्र असते.[१]

महायान पंथाने बुद्धांच्या मूर्तीची पूजा सुरू करण्यापूर्वी साधक लोक स्तूपाची पूजा करीत असत. स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालता यावी यासाठी नंतर प्रदक्षिणा पथ बांधण्याचा प्रघात सुरू झाला. चिनी यात्रेकरूंची प्रवासवर्णने पाहिल्यास त्यात भारतातील स्तूपांचे उल्लेख सापडतात. मौर्य सम्राट अशोकांनी ८४,००० स्तूप बांधलेले होते.

सम्राट अशोक साम्राज्य 260 ईशापूर्व

सांचीचा स्तूप, सारनाथ, भारहूत ह्या ठिकाणचे स्तूप प्रसिद्ध आहेत. अमरावतीच्या परिसरात इ.स.पू. १ ते ३ या काळात धार्मिक दृष्ट्या बांधले गेलेली स्तूप दिसतात. त्यावर विशेष अशा शिल्पाकृतीही आहेत.

चित्रदालन संपादन

हे ही पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
  2. ^ "ANCIENT STUPAS IN SRI LANKA – LARGEST BRICK STRUCTURES IN THE WORLD" (PDF). stupa.org. 2011-07-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत