हिंदू महाकाव्य रामायणानुसार भरत (निस्संदिग्ध नाव: भरत दाशरथि; संस्कृत: भरत; भासा इंडोनेशिया: Barata; चिनी: पोलोतो; बर्मी: भाद्रा; भासा मलेशिया: Baradan, तमिळ: பரதன் ; थाई: พระพรต ;) हा दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र आणि रामाचा भाऊ होता. राम, सीतालक्ष्मण यांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने अयोध्येचे राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.

राम वनवासाला निघाला असताना त्याच्या पादुका मागून घेताना भरत : बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी चितारलेले चित्र