ब्राह्मण गाय
ब्राह्मण गाय हा एक अमेरिकन पशु-गोवंश असून याची निर्मिती विविध भारतीय गोवंशापासून झालेली आहे.[१]
अमेरिकेतील ब्राह्मण गोवंश | |
मूळ देश | अमेरिका |
---|---|
आढळस्थान | अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया |
मानक | FAO |
उपयोग | मांसाहार |
वैशिष्ट्य | |
वजन | |
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
|
या गाईच्या निर्मितीसाठी अंदाजे २६६ विविध वळू आणि २२ गाईंचा वापर करण्यात आला. यात गीर, ओंगल, कृष्णातिरी, कांकरेज, हरियाना आदी भारतीय वंश वापरण्यात आले.[२] तसेच भारतीय गाईपासून निर्मित ब्राझील मधील गुझेरात आणि नेल्लूर नावाचे संकरित वंश सुद्धा वापरल्या गेले. परिणाम स्वरूप एक अत्यंत काटक, विविध प्रतिकूल परिस्थितीत टिकणारी, जाड त्वचा असलेली उंचपुरी प्रजाती निर्माण झाली.[३] या प्रजातीचा मुख्य उपयोग मांसाहारासाठी करण्यात येतो.[४][५]
तसेच ही गाय अमेरिकेतून अर्जेटीना, ब्राझील, ओमान सहित अनेक देशात निर्यात केली जाते. ब्राह्मण गायिपासून नंतर बीफ मास्टर, सांता गरडरीयस, ब्रँगस, ब्रैँफोर्ड सहित अनेक नवीन परदेशी गोवंश निर्माण केल्या गेले.. [४]
भारतीय गायीच्या इतर जाती
संपादनभारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b c "भारत की देसी नस्लों से तैयार हुई हैं विदेशी गाय" (हिंदी भाषेत). ३० मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sagari R Ramdas. "The loss of our breeds". downtoearth.org.in (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Bullfighting à la Batinah". Rough Guides. 2017-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-25 रोजी पाहिले.
- ^ a b "Brahman Cattle" (english भाषेत). ३० मार्च २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Mason's World Encyclopedia of Livestock Breeds and Breeding, 2 Volume Pack" (इंग्रजी भाषेत).
बाह्य दुवे
संपादन- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]