बोईंग ७८७

(बोईंग ७८७-८ या पानावरून पुनर्निर्देशित)

बोईंग ७८७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

बोईंग ७८७

प्रवासी सेवेत रुजू झालेले पहिले ऑल निप्पॉन एरवेझचे ७८७ (जेए८०१ए)

प्रकार लांब पल्ल्याचे मोठे प्रवासी जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९
समावेश ऑक्टोबर २७, इ.स. २०११
सद्यस्थिती प्रवासी सेवेत
मुख्य उपभोक्ता ऑल निप्पॉन एरवेझ
उत्पादित संख्या १ (ऑक्टोबर २०११)
एकूण कार्यक्रमखर्च ३२ अब्ज अमेरिकन डॉलर[]
प्रति एककी किंमत ७८७-८:१९ कोटी ३५ लाख अमेरिकन डॉलर[]
७८७-९: २२ कोटी ७८ लाख अमेरिकन डॉलर[]

याचे पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९ या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण ऑक्टोबर २७, इ.स. २०१० रोजी झाले.

उपप्रकार

संपादन

बोईंग ७८७चे तीन उपप्रकार आहेत. मूळ ७८७-८ प्रकारचे विमान ५७ मीटर (१८६ फूट) लांबीचे असून हे साधारणतः २४२ प्रवासी १३,६२० किमी (७,३५५ समुद्री मैल) वाहून जाऊ शकते. ७८७-९ उपप्रकाराची लांबी ६३ मीटर (२०६ फूट) असून हे विमान २९० प्रवाशांना १४,१४० किमी (७,६३५ समै) वाहून जाऊ शकते. सगळ्यात मोठ्या ७८७-१० प्रकारचे विमान ६८ मीटर (२२४ फूट) लांबीचे आहे आणि हे ३३० प्रवाशांना ११,९१० किमी (६,४३० समै) नेऊ शकते. -९ उपप्रकार पहिल्यांदा एएनए विमानकंपनीने ७ ऑगस्ट, २०१४ रोजी उडविला तर -१० उपप्रकारचे पहिले विमान सिंगापूर एअरलाइन्सने ३ एप्रिल, २०१८ रोजी उडविले.


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ डॉमिनिक गेट्स. "Boeing celebrates 787 delivery as program's costs top $32 billion". The Seattle Times. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)
  2. ^ a b "Boeing Commercial Airplanes prices [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)