बी.डी. जत्ती
बसप्पा धनप्पा जत्ती (सप्टेंबर १०, इ.स. १९१२:सावळगी - जून ७, इ.स. २००२) हे भारताचे उपराष्ट्रपती व कार्यवाहू राष्ट्रपती होते.
बी.डी. जत्ती | |
7 वे भारतीय राष्ट्रपती
| |
---|---|
यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्ह्यात सावळगी गावात झाला. त्यांनी साइक्स लॉ कॉलेज, कोल्हापुर येथे कायद्याचे शिक्षण घेतले व जमखंडी येथे वकिलीचे काम सुरू केले.
जत्तींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जमखंडी नगरपालिकेपासून केली. यानंतर ते जमखंडी विधानसभेवर निवडुन गेले. मजल-दरमजल करीत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद व ओडिशाचे राज्यपालपद मिळवले. इ.स. १९७४ ते इ.स. १९८० पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती होते व फेब्रुवारी ते जुलै इ.स. १९७७ या कालखंडात त्यांनी कार्यवाहू राष्ट्रपतीपद सांभाळले.
मागील: फक्रुद्दीन अली अहमद |
भारतीय राष्ट्रपती (कार्यवाहू) फेब्रुवारी ११, १९७७ – जुलै २५, १९७७ |
पुढील: नीलम संजीव रेड्डी |