बाळाभाऊ महाराज पितळे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मेहकर,जिल्हा बुलडाणा येथे परमहंस परिव्राजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचे ज्ञानमंदीर हे हंस संप्रदायाचे गुरूपीठ तसेच प्राचीन कालीन एकादश नृसिंहातील ६वे प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह मंदिर असून येथे विद्यमान गुरुपीठाधिश अ्ॅंड.रंगनाथ महाराज पितळे (बाबासाहेब)यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धार्मिक,पारंपरिक, सामाजिक कार्यक्रम होतात.
संत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर | |||
मूळ नाव | संत बाळाभाऊ महाराज पितळे | ||
जन्म | इ.स. १८८८
मेहकर | ||
संजीवन समाधी | श्री श्वासानंद आश्रम, जंगमवाडी,वाराणसी(उ.प्र.) पौष कृ.१२,इ.स.१९३० | ||
'कुलदैवत | लक्ष्मीनृसिंह, मेहकर | ||
उपास्यदैवत | लक्ष्मीनृसिंह, दत्त,विठ्ठल | ||
संप्रदाय | वारकरी संप्रदाय+दत्त संप्रदाय+नाथ संप्रदाय=हंस संप्रदाय | ||
गुरू | आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, विश्रांती मठ,नाव्हा,जि.जालना | ||
उत्तराधिकारी' | वै.दत्तात्रय महाराज पितळे(१९३०-१९४०),वै.दिगंबर महाराज पितळे(१९४०-१९९५),रंगनाथ महाराज पितळे(विद्यमान) | ||
दिंडी' | विदर्भातील पहिली मेहकर ते पंढरपूर, पैठण,मुक्ताईनगर, माहूर, घ्रुष्णेश्वर या दिंड्या प्रारंभ | कार्य | अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन,समरसता,दिंड्या,ब्राह्मणेतरांच्या मौंजी,धर्मशुद्धी,गायत्रीमंत्र सर्वांसाठी खुला करणे,वारकरी संप्रदायात अष्टगंध बुक्का लावण्याचे प्रचलन,नामसप्ताह,चातुर्मास, यज्ञ, |
प्रसिद्ध वचन | विश्वासो फलदायकः,ज्ञानमंदीराचा दगडही वाया जाणार नाही, यहा ज्ञानमंदीरमे नम्रताका सर ऊॅंचा है और सेवा यह महाव्रत है,तुम्ही तरूनी विश्व तारा, | संबंधित तीर्थक्षेत्रे | ज्ञान मंदिर मेहकर,विश्रांती मठ नाव्हा,श्वासानंद आश्रम वाराणसी, गायत्री सिद्धपीठ,मुर्डेश्वर,विश्वासानंद संस्थान कांबी, टाकरवन,माहेरखेड |
शिष्यसंख्या | अंदाजे १०लाख | ||
प्रकाशने | श्वासानंद माऊली,दत्तबादशहा, माऊली सार,संप्रदाय संहिता, पादपद्म परागाष्टक,सच्चित सुख घनदेव,श्रीगुरू कल्पतरू सागर | ||
संपर्क | प्रा.डॉ. श्रीहरी रंगनाथराव पितळे, ज्ञानमंदीर, मु.पो.ता.मेहकर, जि.बुलढाणा. मो.८००७४६१६८६,९४२०१८२५६६,९४०४८६७३०४,९०११८५२९८८ | ||
वेबसाईट | http://balabhaumaharajpitale.in/ Archived 2018-01-17 at the Wayback Machine. |
जन्म व बालपण
संपादनसंत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर हे वारकरी संप्रदायाचे एक संत होते. पितळे घराण्याच्या नऊ पिढ्यांच्या भगवान लक्ष्मीनृसिंहाच्या उपासनेचे फळ म्हणून १८८८ मध्ये पैनगंगा नदीच्या तीरी भगवान नृसिंहाने बाळाभाऊ महाराजाच्या मेहकर रूपाने अवतार घेतला, अशी कल्पना आहे.
गुरुदीक्षा
संपादनजालना जिल्ह्यातील नाव्हा गावात बाळाभाऊ पितळे यांना आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराजांची गुरुदीक्षा मिळाली,
हंस संप्रदायाची स्थापना
संपादनगुरुदीक्षा मिळाल्यावर बाळाभाऊ महाराजांनी नाथसंप्रदाय दत्तसंप्रदाय मी वारकरी संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम असणारा हंस संप्रदाय रूढ केला. विदर्भातून पहिली पायी दिंडी पंढरपूरला नेली. ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो नामसप्ताह यज्ञ सोहळे आयोजित करून प्रत्येक चातुर्मासात पंडरपूरची पायी वारी करून सर्व जातिधर्माच्या लोकांना भक्तिमार्गात आणले. जातिभेद निर्मूलन धर्म शुद्धीकरण आणि समाज परिवर्तनासाठी महाराजांनी लक्षणीय कार्य केले. त्रैवर्णिक यांच्या मौंजीबंधनांचा समारंभ त्यांनी आयुष्यात दोनदा आयोजित केला.
चमत्कार
संपादनमृतास जीवदान, पुत्रहीनास पुत्रप्राप्ती, गरीब भाजीवालीच्या थैलीतून हजार रुपयांचे दान करणे, नदीतील पाण्याचे तूप करून पंक्तीस वाढणे, पाण्याचे दिवे लावणे, जिवंत वाघाची पूजा, माहूरच्या रेणुका मातेच्या मूर्तीस प्रसाद खाऊ घालणे, स्वतः कालकूट विष पचवणे यासारखे अनेक चमत्कार बाळाभाऊ महाराजांनी केले अशा आख्यायिका आहेत. त्यांच्याकडील मूक प्राणीसुद्धा एकादशीच्या दिवशी काही खात नव्हते, असे सांगितले जाते.
संजीवन समाधी
संपादनचारही आश्रमांचे पालन करून सन १९३०मध्ये काशी बनारस इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते. बाळाभाऊ मार्गांच्या कृपाप्रसादाची अनुभती भक्तांना त्यानंतरही येत असते, असे म्हणतात. वैकुंठवासी दत्तात्रय महाराज आणि वैकुंठवासी समर्थ सदगुरू दिगंबर महाराज यांनी त्यांचा वारसा अखंड चालविला होता. विद्यमान हंस संप्रदायाच्य गुरुपीठाच्या गादीवर (२०१७ साली) ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे ऊर्फ बाबा साहेब आहेत.
पुन्हा दर्शन
संपादनचारही आश्रमांचे पालन करून १९३०मध्ये काशी इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते, असे सांगतात.
ज्ञान मंदिर परिसर मेहकर
संपादनपितळे महाराजांची दिंडी
संपादनविदर्भातील ही पहिली दिंडी असून यात जवळपास शंभर वारकऱ्यांचा समावेश असतो. ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहचते.