बामियान प्रांत तथा बाम्यान प्रांत (दारी/पश्तो:ولایت بامیان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ८ जिल्हे असून येथील लोकसंख्या ४,९५,५५७ आहे.[१] यांतील बव्हंश हजारा असून काही प्रमाणात ताजिक लोकही येथे राहतात. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र बामियान आहे.

सातव्या शतकात येथे बांधलेले बुद्धाचे प्रचंड पुतळे तालिबानने २००१मध्ये भग्न केले.

चतुःसीमासंपादन करा

बामियान प्रांताच्या सीमा परवान प्रांत, बाघलान प्रांत, वारदाक प्रांत, समानगान प्रांत, सर-ए-पोल प्रांत, दायकुंडी प्रांत, घोर प्रांत आणि गझनी प्रांतांना लागून आहेत.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2020-21" (PDF). Islamic Republic of Afghanistan, National Statistics and Information Authority. Archived from the original (PDF) on 2020-07-03. 6 June 2021 रोजी पाहिले.