बारिसाल जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

बारिसाल (बंगाली: বরিশাল বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बंगालचा उपसागर तर इतर तीन दिशांना बांगलादेशाचे इतर विभाग आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने बांगलादेशमधील सर्वात कमी लोकवस्ती असलेला ह्या विभागामधून अनेक नद्या वाहतात. बारिसाल नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली बारिसाल विभागाची लोकसंख्या सुमारे ८३ लाख होती.

बारिसाल विभाग
বরিশাল বিভাগ
बांगलादेशचा विभाग

बारिसाल विभागचे बांगलादेश देशाच्या नकाशातील स्थान
बारिसाल विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानी बारिसाल
क्षेत्रफळ १३,२२५ चौ. किमी (५,१०६ चौ. मैल)
लोकसंख्या ८३,२५,६६६
घनता ६३० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BD-A
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
संकेतस्थळ http://barisaldiv.gov.bd/

बाह्य दुवे

संपादन