फ्रीडरिक्सहाफेन
फ्रीडरिक्सहाफेन (जर्मन: Friedrichshafen) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक छोटे शहर आहे. फ्रीडरिक्सहाफेन शहर जर्मनीच्या दक्षिण भागात बोडनसे सरोवराच्या काठावर जर्मनीच्या ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड देशांसोबतच्या सीमेजवळ वसले आहे. फ्रीडरिक्सहाफेन प्रामुख्याने येथील झेपलिन ह्या हवाई जहाजाच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे.
फ्रीडरिक्सहाफेन Friedrichshafen |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | बाडेन-व्युर्टेंबर्ग | |
स्थापना वर्ष | इ.स. १८११ | |
क्षेत्रफळ | ६९.९१ चौ. किमी (२६.९९ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,३०० फूट (४०० मी) | |
लोकसंख्या (२०१३) | ||
- शहर | ५७,९६१ | |
- घनता | ८२९ /चौ. किमी (२,१५० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.friedrichshafen.de |
फ्रीदरिक्सहाफेन व्युर्टेंबर्ग राजतंत्राद्वारे नेपोलियोनिक युद्धांदरम्यान इ.स. १८११ साली वसवले गेले. १९व्या शतकाच्या अखेरीस फर्डिनांड फॉन झेपलिनने येथे झेपेलिन जहाजांचे उत्पादन सुरू केले होते. दुसऱ्या महायुद्धकाळात फ्रीडरिक्सहाफेनचा २/३ भाग दोस्त राष्ट्रांच्या बॉबहल्ल्यामध्ये उध्वस्त झाला होता.
संदर्भ
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |