फ्रांचेशेत्तो सिबो
फ्रांचेशेत्तो तथा फ्रांचेस्को सिबो ( फ्रान्सिस्को ) (१४५० - २५ जुलै, १५१९) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील जहागीरदार होता. हा पोप इनोसंट आठव्याचा अनौरस मुलगा होता. कालांतराने त्याच्या वडिलांनी त्याचे स्वतःचा कायदेशी वारस करून घेतले. फ्रांचेशेत्तोला जुगार आणि इतर भानगडी करण्याचे व्यसनच होते. यासाठी त्याने पोपच्या खजिन्यातून परस्पर अवास्तव खर्च केला. [१] याचे लग्न फिरेंझच्या मेदिची घराण्यातील माद्दालेना दे मेदिचीशी झाले. या राजकीय दृष्टीने ठरवलेल्या लग्नातून फिरेंझे, रोम आणि युरोपवर प्रभावशाली असे राजघराणे तयार झाले. याचे वंशज आजही शक्तिशाली जागांवर आहेत..
Italian noble, illegitimate child of Pope Innocent VIII | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Franceschetto Cybo | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | c. इ.स. १४५० (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान) नापोली | ||
मृत्यू तारीख | जुलै २५, इ.स. १५१९ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान) रोम | ||
चिरविश्रांतीस्थान | |||
व्यवसाय |
| ||
उत्कृष्ट पदवी |
| ||
कुटुंब |
| ||
वडील | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
फ्रांचेशेत्तोचा जन्म नेपल्समध्ये १४५० मध्ये एक अज्ञात नापोली स्त्री आणि जियोव्हानी बात्तिस्ता सिबो (पुढे पोप इनोसंट आठवा) यांच्या पोटी झाला. [२] त्याचे मूळ नाव फ्रांचेस्को असले तरी त्याच्या लहानखुऱ्या चणी मुळे त्याला फ्रांचेशेत्तो असे टोपणनाव मिळाले.
त्याच्या वडिलांची पोप इनोसंट आठवा म्हणून निवड झाल्यानंतर फ्रांचेशेत्तोच्या भानगडींना ऊत आला. [२] त्याचे लग्न नापोलीच्या राजाच्या एका अनौरस मुलीशी लग्न करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अखेरीस लॉरेंझो दे मेदिचीची मुलगी माद्दालेना दे मेदिचीशी झाले. [२] हा पोप इनोसंट आठवा आणि लॉरेंझो यांच्यातील करारनुसार फ्रांचेशेत्तोशी आपल्या मुलीचे लग्न लावण्याच्या बदल्यात इनोसंटने लॉरेंझोचा मुलगा जियोव्हानी दे मेदिचीला कार्डिनलपदी नियुक्त केले. हा पुढे जाउन पोप लिओ दहावा झाला. [१]
सप्टेंबर 1490मध्ये इनोसंट आठव्याच्या मृत्यूच्या खोट्या अफवा पसरल्यावर फ्रांचेशेत्तोते पोपचा खजिना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला [२] आणि खंडणीसाठी सुलतान मेहमेद दुसरा याचा मुलगा सेम याला ओलिस धरले. पोप जिवंत असल्याचे कळल्यावर हे सगळे फसले, परंतु खजिन्याचा मोठा भाग नंतर कधीच सापडला नाही. [१]
दोन वर्षांनंतर, इनोसंटच्या मृत्यूनंतर पोप अलेक्झांडर सहाव्याची निवड झाल्यावर फ्रांचेशेत्तोने रोममधून पळ काढला. इटलीतील अनेक शहरांमध्ये फिरत असताना त्याला वडिलांच्या अनेक संपत्ती विकण्यास भाग पाडले गेले. पुढे पोप ज्युलियस दुसऱ्याच्या निवडीनंतर १५०३मध्यो अखेरीस रोमला परतला व त्याला स्पोलेतोचा ड्यूक ही पदवी दिली गेली.
फ्रांचेशेत्तोचा मेहुणा (माद्दालेनाचा भाऊ) जियोव्हानी पोप लिओ दहावा झाल्यानंतर फ्रांचेशेत्तोला चांगले दिवस आले. लिओने त्याला अनेक पदव्या दिल्या आणि कालांतराने फ्रांचेशेत्तोचा मुलगा इनोसेंझोला कार्डिनल बनवले. [१]
मृत्यू
संपादन१५१९मध्ये ट्युनिसहून परतल्यावर फ्रांचेशेत्तोचा मृत्यू झाला. त्याला सेंट पीटर्स बॅसिलिका येथील आपले वडील इनोसंट आठव्याच्या कबरीजवळ दफन केले गेले.
- ^ a b c d Petrucci, Franca. "Dizionario Biografico degli Italiani, vol. XXV (1981)". चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b c d Williams 1998.