माद्दालेना दे मेदिची
मरिया माद्दालेना रोमोलो दे मेदिची तथा माद्दालेना दे मेदिची (२५ जुलै, १४७३ - २ डिसेंबर, १५२८) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील मेदिची घराण्यातील स्त्री होती. ही लॉरेंझो दे मेदिची याची मुलगी होती. [१] हिचा जन्म व बालपण फिरेंझेमधील होते. ही तिच्या भावंडांसोबत अँजेलो पॉलिझियानो व इतर शिक्षकांकडे शिकले. यामुळे तिच्यावर मानवतावादी संस्कृतीचा प्रभाव होता. [२] हिचे लग्न फेब्रुवारी १४८९ मध्ये पोप इनोसंट आठव्याचा अनौरस मुलगा फ्रांचेशेत्तो सिबो याच्याशी झाले. [२] यात तिने ४,००० डकट्सचा हुंडा आणल्याची नोंद आहे. [२] या विवाहामुळे तिचे कुटुंब आणि व्हॅटिकन यांच्यातील संबंध दृढ झाले. यामुळे पुढे जाता तिचा भाऊ जिओव्हानीला कार्डिनल म्हणून नियुक्ती मिळण्यास मदत झाली. [२] माद्दालेनाने तिचे वडील, तिचा भाऊ पिएरो आणि पोप यांच्यावरील आपल्या तिच्या प्रभावाचा उपयोग मित्रांना आणि गरीब लोकांना चर्च आणि सरकारमध्ये मदत आणि पद मिळवून देण्यासाठी केला. [२]
Italian noble | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २५, इ.स. १४७३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान) फ्लोरेन्स | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २, इ.स. १५१९ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान) रोम | ||
चिरविश्रांतीस्थान | |||
व्यवसाय |
| ||
कुटुंब | |||
वडील | |||
आई | |||
भावंडे | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
१४८८मध्ये तिने स्तिलियानो शहरातील गरम पाण्याचे झरे असलेले सार्वजनिक न्हाणीघर विकत घेतले व बुडीत चाललेल्या हा व्यवसायाचे पुनरुत्थान करून ते फायदेशीर करून घेतले. [३]
१५१३ मध्ये तिचा भाऊ जिओव्हानी पोप लिओ दहावा म्हणून निवडून आल्यानंतर माद्दालेना रोमला राहण्यास गेली [२] पोप लिओने तिचा मुलगा इनोसेन्झोला कार्डिनल बनवले. [२] १५१५मध्ये माद्दालेनाला तिच्या भावाकडून रोमन नागरिकत्व आणि निवृत्तीवेतन मिळाले. [२] तिने आपल्या सर्व मुलांची लग्ने उच्चभ्रू कुटुंबात करून दिली. [२] माद्दालेनाने रोमध्ये राहून पोप लिओ दहावा आणि आपला पुतण्या उर्बिनोचा ड्यूक लॉरेंझो यांच्या मदतीने लोकांना संरक्षण, मदत आणि तुरुंगातून सोडवण्याची कामे केली आणि हद्दपारीची शिक्षा कमी करण्यास मदत केली. [२] ती रोममध्ये मृत्यू पावल्यावर तिच्या चुलत भाऊ पोप क्लेमेंट सातव्याच्या आदेशानुसार तिला सेंट पीटर बॅसिलिका येथे दफन करण्यात आले.
संदर्भ
संपादन- ^ "10 historical mistakes in the TV Show Medici: Masters of Florence". 5 January 2017.
- ^ a b c d e f g h i j Tomas 2003.
- ^ Tomas 2003, पान. 90.