फोडणी म्हणजे भारतीय उपखंडात वापरण्यात येणारे पाककृतीचे तंत्र आहे. त्यात मोहरी, हळद, हिंग, मेथी, जिरे, शहाजिरे, मिरे, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ तेलात किंवा तुपात घालून अल्पकाळासाठी गरम करतात. यामुळे मसाल्यातील जरुरीची तेले स्वतंत्र होऊन स्वाद वाढण्यास मदत होते. काही पदार्थ (आमटी, सांबार) प्रथम फोडणी करून नंतर त्यात मुख्य जिन्नस वाढवून केले जातात काही पदार्थांत(दही बुत्ती) शेवटी वरून फोडणी घातली जाते.

फोडणी