रघुपती सहाय (उर्दू: فراق گورکھپوری (ऑगस्ट २८, इ.स. १८९६ गोरखपूर, उत्तरप्रदेश - मार्च ३, इ.स. १९८२ नवी दिल्ली) हे प्रसिद्ध उर्दू साहित्यिक फिराक गोरखपूरी या नावाने प्रसिद्ध आहेत.

रघुपति सहाय
जन्म नाव रघुपति सहाय
टोपणनाव फिराक गोरखपूरी
जन्म ऑगस्ट २८, इ.स. १८९६
गोरखपूर
मृत्यू मार्च ३, इ.स. १९८२[१]
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र उर्दू साहित्य
साहित्य प्रकार गझल, नज्म, रूबाई
प्रसिद्ध साहित्यकृती गुल-ए-नग्मा
पत्नी किशोरी देवी
पुरस्कार नेहरू पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार

फिराक गोरखपूरी यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे २८ ऑगस्ट इ.स. १८९६ साली झाला होता. त्यांचे शिक्षण अरबी, फारसी आणि इंग्रजी भाषेतून झाले. यांचा विवाह किशोरी देवी यांच्याबरोबर २९ जून इ.स. १९१४ साली झाला. इ.स. १९२० मध्ये आय.सी.एस.ची नोकरी सोडून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना दिड वर्षाचा तुरूंगवासही भोगावा लागला होता. तुरुंगवास संपल्यावर पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सचिवपद दिले होते. हे पद सोडल्यानंतर फिराक गोरखपूरी यांनी इ.स. १९३० पासून इ.स. १९५९ पर्यंत अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापक म्हणून काम केले.[२]

साहित्य

संपादन
उर्दू कवितासंग्रह
  • गुल-ए-नग्मा
  • नग्म-ए-साज
  • रूहे-कायनात
  • गजालिस्तान
  • शेरिस्तान
  • शबनमिस्तान
  • रूप

  • धरती की करवट
  • गुलबाग
  • रम्ज व कायनात
  • चिरागां
  • शोअला व साज
  • हजार दास्तान
  • बज्मे जिन्दगी

कादंबरी

  • साधु और कुटिया

पुरस्कार

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "फिराक गोरखपुरी ने अर्ज किया है..." (हिंदी भाषेत). २९ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "रघुपति सहाय फ़िराक़' गोरखपुरी" (हिंदी भाषेत). 2010-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)