फेर्दिनांद मार्कोस
फिलीपिन्सचे १० वे अध्यक्ष (१९६५-८६)
(फर्डिनांड इम्मॅन्युएल एड्रालिन मार्कोस या पानावरून पुनर्निर्देशित)
फेर्दिनांद एम्मानुएल एद्रालिन मार्कोस (फिलिपिनो: Ferdinand Emmanuel Edralin Marcos ;) (सप्टेंबर ११, इ.स. १९१७ - सप्टेंबर २८, इ.स. १९८९) हा फिलिपिन्साचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १९६५ ते इ.स. १९८६ या कालखंडात तो अधिकारारूढ होता. पेशाने वकील असलेला मार्कोस इ.स. १९४९-१९५९ सालांदरम्यान फिलिपिन प्रतिनिधिगृहाचा सदस्य होता, तर इ.स. १९५९-१९६५ या सालांदरम्यान फिलिपिन सेनेटीचा सदस्य होता. इ.स. १९६३-१९६५ या कालखंडात त्याने सेनेटीचे अध्यक्षपदही सांभाळले. त्याच्या अध्यक्षीय राजवटीत देशातील पायाभूत सुविधांचा विकास झाला. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय व्यूहात्मक गरजा ओळखून परराष्ट्र संबंधांची आखणी केली. मात्र त्याच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय भ्रष्टाचार, राजकीय दडपशाही व मानवी हक्कांची पायमल्लीही घडली.
फेर्दिनांद मार्कोस | |
फिलिपिन्सचा १०वा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ३० डिसेंबर १९६५ – २५ फेब्रुवारी १९८६ | |
मागील | दियोसदादो माकापागाल |
---|---|
पुढील | कोराझोन एक्विनो |
जन्म | ११ सप्टेंबर, १९१७ इलोकोस नोर्ते, फिलिपिन्स |
मृत्यू | २८ सप्टेंबर, १९८९ (वय ७२) होनोलुलु, हवाई, अमेरिका |
पत्नी | इमेल्दा मार्कोस |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |