इमेल्दा मार्कोस (जन्मनाव:इमेल्दा रोमुआल्देझ; २ जुलै, १९२९:मनिला, फिलिपिन्स - ) ही फिलिपिन्सचा राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोसची पत्नी होती. आपला पती सत्तेवर असताना इमेल्दाने अमाप संपत्ती गोळा केली होती. एकेकाळी तिच्याकडे १,००० पेक्षा जास्त पायताणे होती. याशिवाय तिने कपडे, दागिने, कलाकृतींसह मोठ्या प्रमाणात पैसा बहुराष्ट्रीय बॅंकांमध्ये दडवून ठेवलेले आहे. आजतगायत ती फिलिपिन्समधील सगळ्यात धनाढ्य राजकारण्यांपैकी एक आहे.