प्रिया बेर्डे

मराठी चित्रपट अभिनेत्री
(प्रिया अरूण या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रिया बेर्डे (जन्मदिनांक १७ ऑगस्ट १९६७) ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. इ.स. १९८८ साली अशी ही बनवाबनवी या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

प्रिया बेर्डे
जन्म

प्रिया बेर्डे
१७ ऑगस्ट, १९६७ (1967-08-17) (वय: ५७)

[]
इतर नावे प्रिया अरुण
राष्ट्रीयत्व भारतभारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८८ ते आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट अशी ही बनवाबनवी
वडील अरुण कर्नाटकी
आई लता अरुण
पती
लक्ष्मीकांत बेर्डे
(ल. १९९८; मृ. २००४)
अपत्ये अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे []
टिपा
मराठी चित्रपट अभिनेत्री

कर्नाटकी या प्रसिद्ध फिल्मी घराण्यात प्रिया बेर्डे यांचा जन्म झाला, त्या काळचे प्रसिद्ध छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांची नात व मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांच्या त्या कन्या होत. पहिल्यापासूनच अभिनयाची आवड म्हणून मराठी सिनेमात त्यांनी प्रवेश केला. विनोदी चित्रपटांच्या त्या जमान्यात लोकप्रिय विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची अशी जोडी जमली की प्रत्यक्ष जीवनातदेखील ते एकमेकांचे जोडीदार झाले. दोघांचे एकत्र असे अनेक विनोदी सिनेमे गाजले.

एक धागा, आम्ही तिघी या दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांना अभिनय बेर्डेस्वानंदी बेर्डे अशी दोन मुले आहेत. अभिनय याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले.

अभिनया व्यतिरिक्त उपजीविकेचे साधन म्हणून प्रिया बेर्डे यांनी लोणावळा परिसरातील बावधन येथे 'चख ले' नावाने एक शाकाहारी उपहारगृह सुरू केले. मागणी आणि प्रतिसाद पाहून बेर्डे यांनी या उपहारगृहात मांसाहारी पदार्थ देखील बनवण्यास सुरुवात केली. बेर्डे यांचे माहेर कोल्हापूरचे आणि सासर कोकणातील, यामुळे त्यांचा दोन्ही पद्धतीने पदार्थ बनवण्यात चांगलाच हातखंडा बसला होता. हीच आवड त्यांना या क्षेत्रात घेऊन आली. पुढे सप्टेंबर २०२१ मध्ये बेर्डे यांनी पुण्यातील पाउंड रोडवर याच नावाने दुसरे उपहारगृह सुरू केले. उपहारगृहातील व्यवस्थापन आणि प्रिया बेर्डे यांचे नाव, यामुळे हे दोन्ही उपहारगृहे चांगलीच प्रसिद्धीस आलीत. बेर्डे जरी स्वतः येथे बसत नसल्या तरी त्या वेळच्यावेळी उपहारगृहास भेट देऊन व्यवस्थापणावर देखरेख करत असतात.[]

चित्रपट-कारकीर्द

संपादन
  • अफलातून
  • अशी ही बनवाबनवी
  • एक गाडी बाकी अनाडी
  • चल धर पकड
  • जान
  • घनचक्कर
  • जत्रा
  • डम डम डिगा डिगा
  • तु. का. पाटील []
  • देवा शप्पथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही
  • धमाल जोडी
  • धरलं तर चावतंय
  • प्रेमासाठी
  • फुल थ्री धमाल
  • बजरंगाची कमाल
  • बेटा
  • बोकड
  • मला अण्णा व्हायचंय
  • येडा की खुळा
  • योद्धा
  • रंगत संगत
  • रंपाट []
  • द स्ट्रगलर - आम्ही उद्याचे हिरो

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ http://www.marathi.tv/actress/priya-berde/
  2. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/laxmikant-berdes-daughter-swanandi-to-make-her-acting-debut/articleshow/62682214.cms
  3. ^ "अभिनेत्री प्रिया बेर्डेंची आणखी एक हॅट्रिक, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव". लोकमत. २ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/tukapatil-coming-soon/21086
  5. ^ "रंपाट-सिनेरिव्ह्यूव्यू". https://maharashtratimes.indiatimes.com. 2019-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-22 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन