प्रियंका गांधी
प्रियंका गांधी वाड्रा ( १२ जानेवारी, १९२२, दिल्ली) या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत.
प्रियंका गांधी वाड्रा | |
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस
(पूर्वी उत्तर प्रदेश) | |
विद्यमान | |
पदग्रहण 7 फेब्रुवारी, 2019 | |
जन्म | १२ जानेवारी, १९७२ दिल्ली, भारत |
---|---|
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आई | सोनिया गांधी |
वडील | राजीव गांधी |
पती | रॉबर्ट वाड्रा |
नाते | राहुल गांधी |
अपत्ये | रेहान वाड्रा मिर्या वाड्रा |
निवास | दिल्ली |
सही |
त्या राजीव आणि सोनिया गांधी यांच्या कन्या, राहुल गांधींची बहीण आणि फिरोज आणि इंदिरा गांधी यांच्या नात आहेत, त्या राजकीयदृष्ट्या प्रमुख नेहरू-गांधी परिवाराच्या सदस्य आहेत. तसेच त्या राजीव गांधी फाउंडेशनच्या विश्वस्तही आहेत.[१]
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
संपादनप्रियंका गांधी यांचे शालेय शिक्षण मॉडर्न स्कूल (नवी दिल्ली) आणि कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, दिल्ली येथे झाले. त्यांनी जीसस अँड मेरी कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली, आणि नंतर 2010 मध्ये बौद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[२][३]
राजकीय कारकीर्द
संपादनगांधी आपल्या आईच्या आणि भावाच्या रायबरेली आणि अमेठीच्या मतदारसंघांना नियमित भेट देत होत्या, जिथे त्या नेहमी थेट लोकांशी संवाद साधत असायच्या.[४] 2004च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्या आई सोनियांच्या प्रचार व्यवस्थापक होत्या आणि त्यांनी भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारावर देखरेख केले.[५]
2007च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, राहुल गांधींनी राज्यव्यापी प्रचाराची धुरा सांभाळत असताना, त्यांनी अमेठी रायबरेली प्रदेशातील दहा जागांवर लक्ष केंद्रित केले, जागा वाटपावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील भांडण शमवण्यासाठी दोन आठवडे घालवले.[६]
सक्रिय राजकारण आणि AICC सरचिटणीस
संपादन23 जानेवारी 2019 रोजी, प्रियांका गांधी यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला, त्यांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त केले गेले.[७] 11 सप्टेंबर 2020 रोजी तिची संपूर्ण उत्तर प्रदेश प्रभारी महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ऑक्टोबर 2021 मध्ये, पोलीस कोठडीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्रा येथे जात असताना गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांनी मेळाव्यावर बंदी घातली होती.[८]
2022 उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक
संपादनप्रियंका गांधी यांनी 23 ऑक्टोबर 2021 रोजी बाराबंकी येथून काँग्रेस पक्षाच्या उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात केली.[९] काँग्रेस पक्ष 2022ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक गांधींच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.
2022च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्याची शक्यता आहे.[१०][११]
खाजगी आयुष्य
संपादनत्यांचे लग्न दिल्लीतील व्यापारी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी झाले. 18 फेब्रुवारी 1997 रोजी गांधींच्या घरी, १० जनपथ येथे हा विवाह पारंपारिक हिंदू समारंभात झाला.[१२] एक मुलगा आणि मुलगी अशी त्यांना दोन मुले आहेत
प्रियंका या बौद्ध तत्त्वज्ञानाचे पालन करतात आणि एस.एन. गोएंका यांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यना करतात.[१३]
संदर्भ
संपादन- ^ Proceedings of the compilation of the co-located workshops on DSM'11, TMC'11, AGERE!'11, AOOPES'11, NEAT'11, & VMIL'11 - SPLASH '11 Workshops. New York, New York, USA: ACM Press. 2011. ISBN 9781450311830.
- ^ "Priyanka Gandhi Biography - About family, political life, awards won, history". Elections in India. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ February 11, Bhavna Vij-Aurora New Delhi; February 20, 2012 ISSUE DATE:; February 20, 2012UPDATED:; Ist, 2012 13:02. "UP polls 2012: Robert Vadra bids for a place in Gandhi family power structure". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "India Today". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2022-01-01.
- ^ "Priyanka may be assigned 100 constituencies". www.rediff.com. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ Rana, Uday. "Congress weighing possibility of Priyanka Gandhi's role in UP election campaign".
- ^ Team, BS Web (2019-01-23). "Priyanka Gandhi appointed Congress party general secretary for UP-east".
- ^ LucknowOctober 20, Shilpi Sen Ashish Mishra; October 20, 2021UPDATED:; Ist, 2021 16:32. "Priyanka Gandhi detained on way to meet family of Agra man who died in police custody". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Oct 23, Shailvee Sharda / TNN /; 2021; Ist, 23:57. "Uttar Pradesh: Priyanka Gandhi Vadra kicks off Congress poll campaign with seven vows | Lucknow News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Priyanka Gandhi will be face of Congress election campaign in U.P., says P.L. Punia" (इंग्रजी भाषेत). PTI. New Delhi. 2021-10-17. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
- ^ आत्तापर्यंतच्या निवडणूक रॅलीचा एकमेव चेहरा गांधी हेच राहिले असण्याची शक्यता या घटकावरून वर्तवली जात आहे.[१]
- ^ "Rediff On The NeT: Traditional Hindu wedding for Priyanka Gandhi". web.archive.org. 2013-09-13. 2013-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "Priyanka Gandhi Vadra | Outlook India Magazine". https://www.outlookindia.com/ (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)