प्रतीत्यसमुत्पाद
प्रतित्य समुत्पाद प्रतित्य म्हणजे प्रत्यय तर,समुत्पाद म्हणजे उत्पन्न होणे. ह्याच्या प्रत्यायने हे उत्पन्न होते. कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाही या कारणाने हे घडते तो सांगणारा सिद्धांत म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत होय.अविध्येच्या प्रत्ययाने संस्कार उत्पन्न होतात, संस्कारच्या प्रत्ययाने विज्ञान उत्पन्न होते, विज्ञानच्या प्रत्ययाने नाम रूप उत्पन्न होते, नाम रूपच्या प्रत्ययाने षडायतन उत्पन्न होते, षडायतनच्या प्रत्ययाने स्पर्श उत्पन्न होते, स्पर्शच्या प्रत्ययाने वेदना उत्पन्न होते, वेदनेच्या प्रत्ययाने तृष्णा उत्पन्न होते, तृष्णाच्या प्रत्ययाने उपादान उत्पन्न होते, उपादानच्या प्रत्ययाने भव उत्पन्न होते, भवच्या प्रत्ययाने जाती (जन्म) उत्पन्न होते, जातीच्या प्रत्ययाने ज़रा,मरण (वर्धाक्य, मृत्यु) हा आहें प्रतित्य समुत्पाद। हे बार निदान (कड़या )आहेत अविध्येचा निरोध झाल्यास संस्कार निरोध पावते या प्रमाणे बारा ही कड़याचा निरोध झाल्यास पुनर्जन्म निरोध पावतो।
विविध भाषेत नाव प्रतीत्यसमुत्पाद | |
---|---|
इंग्रजी |
dependent origination, dependent arising, interdependent co-arising, conditioned arising, etc. |
पाली | पटिच्चसमुप्पाद |
संस्कृत | प्रतीत्यसमुत्पाद |
बंगाली | প্রতীত্যসমুৎপাদ |
बर्मी | साचा:My |
चीनी |
緣起 (pinyin: yuánqǐ) |
जपानी |
縁起 (rōmaji: engi) |
सिंहला | පටිච්චසමුප්පාද |
तिबेटी |
རྟེན་ཅིང་འབྲེ ལ་བར་འབྱུང་བ་ (Wylie: rten cing 'brel bar 'byung ba THL: ten-ching drelwar jungwa) |
थाई | ปฏิจจสมุปบาท |
2]बुद्ध धम्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांत
संपादनबुद्ध धम्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांत
प्रतित्य म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणे तर,समुत्पाद म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणारी क्रिया पुन्हा,पुन्हा होणे म्हणजेच पुनरूपी जनम,पुनरूपी मरण होय.कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाही तो सांगणारा सिद्धांत म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत होय.जन्माला येणे हे जरी आपल्या हातात नसले तरी मानव जन्मात तथागतांच्या धम्माला न जाणताच,न आचरताच मरणे या सारखे अभागी दुसरे कोणी नसुन जे मुकले तेच होय.ज्यांनी,ज्यांनी तथागतांचा धम्म अभ्यासला जाणला अन् त्यानुसार आचरण केले ते प्रतित्य समुत्पाद सिद्धांतानुसार दुःख मुक्तीच्या !!!अत्त दिप भव !!!च्या अशोक चक्रातील चोवीस आऱ्या असलेल्या भवचक्रातील 24आऱ्य तील खालच्या अंधारातील, अधोगतीच्या 12 आऱ्यात नसुन ते अंधारातुन प्रकाशाकडील भवचक्रातील वरच्या,प्रगतीच्या12 आऱ्यात आहेत. तेव्हा अनित्य काय आहे ? शुन्यवाद म्हणजे काय ?अनात्मवाद म्हणजे काय ? पुनर्जन्म आहे काय ? असल्यास कशाचा ? धम्मचक्र,अशोक चक्र, भवचक्र,संसारचक्र काय आहे ?24 आऱ्या किंवा कडा काय आहेत ? त्याचा मानवाशी काय सबंध आहे ? ते कसे फिरते ? यातुन बाहेर कसे पडायचे ? या सर्व प्प्रश्नांची उकल आपण या लेखातुन जाणुन घेऊ.
तत्पुर्वी काल मला धर्म अन् धम्म यातील मुलभुत फरक समजत नसल्याने धम्माला जाणत नव्हतो परंतु आज मी धम्माला जाणेन धम्म म्हणजेच मानवाला पुजा,अर्चा,यज्ञयापन पुजाविधी करण्यापेक्षा मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला सुसंस्कृत वळण लावण्याचे काम करते तर एखादयाला उचित तत्त्व सापडल्यास त्यापासून विचलीत न होण्याचे सांगते.त्याधम्मानुसार आचरण करेन त्याची सुरुवात बोधीसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेपासून आणि तथागतांनी दिलेल्या पंचशीलेपासून करेन अशी प्रतिज्ञा करून आपण आपला जिवनमार्ग सुधारू शकतो याची प्रचीती तुम्हाला आल्यावाचुन राहणार नाही. पंचशीलेपासून सुरुवात झाल्यावर अष्टांग मार्गावर म्हणजेच सदाचाराच्या मार्गावर आरूढ होवुन दस पारमीता,जिवनाच्या दहा अवस्था तसेच कम्म सिद्धांत आणि प्रतित्य समुत्पाद सिद्धांत जाणुन !!! अत्त दिप भव !!! प्रमाणे स्वतः उजाळुन दुस-यासही उजाळुन काढील असा सम्यक संकल्प केल्यास जग हे धम्मराज्य होवुन धम्म हा सद्धम्मस्वरूप होण्यास फारसा वेळ लागणार नाही आणि प्रबुद्ध हो मानवा असेही म्हणण्याची वेळ कोणावर येणार नाही.
तथागतांचा धम्म हा एक वैज्ञानिक शोध आहे तो दुःख मुक्तीचा मार्ग आहे तर ‘अत्त दिप भव’ प्रमाणे उजाळावयाचे आहे.
3]अनित्य
संपादनअनित्यतेच्या सिद्धांताला तिन पैलु आहेत.
3.1)अनेक तत्त्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेत
संपादन1)अनेक तत्त्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेत.ः- सर्व वस्तु हया हेतु आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्त्व नसते.हेतु प्रत्ययाचा उच्छेद झाला की,वस्तुचे अस्तित्त्व उरत नाही.जसे सजीव प्राण्यांचे शरीर पृथ्वी,आप,तेज,आणि वायु या चार महाभुतांचा परिणाम आणि जर या चार महाभुतांचे पृथक्करण झाले तर हा प्राणी, प्राणी म्हणुन उरत नाही.
3.2) व्यक्तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे.
संपादन2) व्यक्तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे.ः- सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन ‘तो नाही,तो होत आहे’या शब्दात करता येईल.मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे.आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो असु शकत नाही.
3.3)प्रतित्य समुत्पन्न वस्तुचे आत्मतत्त्व अनित्य आहे
संपादन3)प्रतित्य समुत्पन्न वस्तुचे आत्मतत्त्व अनित्य आहे.ः- प्रत्येक सजीव प्राणी जीवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे. शुन्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालु आहे.शुन्य हा एक बिंदु समान पदार्थ असुन त्याला आषय आहे परंतु त्याला लांबी रूंदी नाही.शुन्यतेमुळेच सर्व अस्तित्त्व शक्य होते.जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील झाला नसता तर मानवजातीची प्रगतीच खुंटलीअसती.
3.4]अनात्मवाद
संपादनबुद्ध धम्म आत्मा मानीत नसल्यानेच अनात्मवाद हा प्रत्यय उदयास आला. बुद्ध आत्म्याचा पुनर्जन्म मानित नसुन पृथ्वी,आप,तेज,वायु याशरीर घटकांचे पुनर्जन्म मानतात.
4]24 कडा असलेली वर्तुळाकार प्रक्रिया
संपादनमानवी जिवनालाना सुरुवात आहेना अंत आहे.ती एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे.ते वेगाने घडयाळया प्रमाणे फिरते या फिरणा-या चक्रालाच जिवनचक्र,संसार चक्र,भवचक्र,अशोकचक्र असे संबोधले जाते. या अशोकचक्राला एकूण 24 आऱ्या,कडया आहेत. वर्तुळाला जसा व्यास असतो अगदी असाच यालाही एक व्यास आहे या व्यासाच्या पासून घडयाळयाच्या दिषेने खालुन वर वेगाने जाणाऱ्या कडीलाच जिवनचक्र असेही म्हणतात.व्यासाच्या खालच्या 12 कडया या अविदये पासून सुरू होवुन दुःखा जवळ संपतात.हया अंधारातल्या तर व्यासाच्या वरील प्रकाशातल्या 12 कडयांची दुःखा पासून सुरुवात होवुन निर्वाणा जवळ संपतात.अंधारातही दुःख आहे अन् प्रकाशातही दुःख आहे.कारण दुःखाच्या दोन अवस्था आहेत ते ही आपण पाहु. अंधारातील या खालील 12 कडयांपैकी अविदया ,संस्कार या दोन कडया हया भुतकाळात तर विज्ञान,नामरूप, षडायतन, स्पर्ष,वेदना,तृष्णा हया सहा कडया वर्तमानकाळात असतात आणि उपादान,(ग्रहण)भव,जाति (जन्म),दुःख (जरा मरण) हया चार कडया भविष्यकाळातल्या होत.सर्वात प्रथम आपण या 24 कडयातील खालच्या दिशेने म्हणजेच अंधारातल्या,अधोगतीतल्या 12 कडया काय आहेत त्यांना काय म्हणतात ते पाहु या वर्तुळातील घडयाळयाच्या दिशेने व्यासापासून जी सुरुवात होते ती पहिली कडी अविदया होय.
*4.1) अविदया:-
संपादनअविदया:-' तथागतांनी अविदये बाबत अडिच हजार वर्षापुर्वीच सांगीतले.तदनंतर 1848 साली क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांनी अविदयेचे म्हणजेच अज्ञाणाचे महत्त्व विषद करताना म्हणले ‘‘विदये विना मती गेली,मती विना निती गेली,निती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित्त विना शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविदयेने केले.अविदयेमुळे माणुस आंधळा होतो अज्ञाण हेच त्याच्या नाशाला कारणीभुत ठरते.त्याला चांगले वाईट हेच समजत नाही.आपण श्रेष्ठ आहोत ‘मी’ पणा येतो.वेगवेगळया आसक्ती,लोभ,लालसा,प्रेम यातच तो गुरफटला जातो.सर्व नित्य आहे,जग हे सुखमय आहे,आत्मा आहे अशा भ्रामक कल्पनांवरच तो जगत असतो.अशा प्रकारे अविदयेतुन नवीन कर्म त्याच्याकडुन होतात अन् त्याच कर्माचा परिणाम नवीन कारणांना जन्म देतात.त्यास वास्तवतेतील खरे अस्तित्त्वाचे दर्शन झालेले नसते तो आंधळाच असतो.
*4.2) संस्कार:-
संपादनसंस्कार:- अविदयेतुन संस्काराची निर्मिती होते.संस्कार म्हणजे मनाची ठेवण,मनावर होणारे परिणाम हे दोन प्रकारचे आहेत.
4.2.1)चांगले संस्कार:-
संपादन1)चांगले संस्कार:- दुसऱ्याला मदत करणे,लोभाचा त्याग करणे,आईवडिलांची सेवा करणे, उपकाराची जाण ठेवणे आदी.
4.2.2) वाईट संस्कार:-
संपादन2) वाईट संस्कार:- चांगल्या संस्काराच्या विरुद्ध वाईट संस्कार होय. व्देष, मत्सर करणे,लोभी असणे,वाईट चिंतणे उपकाराची जाण न ठेवणे आदी,
*4.3] विज्ञान:-
संपादनविज्ञान:- इंद्रियाच्या सम्पर्कात जे आलम्बन येते तेव्हा होणाऱ्या बोधाला विज्ञान असे म्हणतात 'जसे "डोळयाने पाहुन मिळविलेले ज्ञान चक्षु विज्ञान "संस्काराच्या कडीतुन विज्ञानाची कडी निर्माण होते.संस्काराच्या आधारे आपल्या मनावर झालेले परिणाम त्यामुळे झालेली मनोवृत्ती म्हणजेच विज्ञान होय.जस जसे आपल्यावर बाहय जगाचा सबंध येतो अन् आपले पुर्वसंस्कार चुकीचे आहेत असे समजुन आपण त्यांना त्यागतो ते त्यागल्यास नवीन विज्ञान मनोवृत्ती होते. म्हणजेच विज्ञान स्थिर नसते ते सतत बदलत असते.विज्ञानाचेही सहा प्रकार आहेत.
4.3.1)चक्षु विज्ञान:
संपादन1)चक्षु विज्ञान:- डोळयाने पाहुन मिळविलेले ज्ञान चक्षु विज्ञान
4.3.2) श्रोत विज्ञान:-
संपादन2) श्रोत विज्ञान:- कानाने ऐकुन मिळविलेले ज्ञान हे श्रोत विज्ञान
4.3.3)घ्राण विज्ञान:-
संपादन3)घ्राण विज्ञान:- नाकाने वास घेऊन मिळविलेले ज्ञान हे घ्राण विज्ञान
4.3.4)जिव्हा विज्ञान:-
संपादन4)जिव्हा विज्ञान:- जिभेच्या चवीच्या सहाय्याने मिळविलेले ज्ञान हे जिव्हा विज्ञान होय.
4.3.5)स्पर्श विज्ञान:-
संपादन5)स्पर्श विज्ञान:- त्वचेला स्पर्शकरून मिळविलेले ज्ञान हे स्पर्शविज्ञान
4.3.6) मनोविज्ञान:-
संपादन6) मनोविज्ञान:- मनावर होणारे संस्कार व त्या संस्कारामुळे मिळालेले ज्ञान म्हणजेच मनपटलावर उमटलेले परिणाम यालाच मनोविज्ञान म्हणतात.
*4.4) नामरूप:-
संपादननाम म्हणजे चेतना (चेतनेतून चित्ताची निर्मिति होते, चित्त म्हणजे मन) आणि रूप म्हणजे शरीर (चार महा भूत पृथ्वी,आप,तेज़ आणि वायु यानी बनलेले)
नामरूप:-विज्ञान कडी पासून नामरूप निर्माण होते.नामरूपाशिवाय स्वतंत्र अस्तित्त्व नाही.मानवाच्या संपूर्ण अस्तित्त्वाचेच कारण विज्ञान आहे.तेच नामरूप पंचस्कंधामध्ये विभागले गेले आहे.ते खालील प्रमाणे
4.4.1) रूप
संपादन1)रूप:- रूप स्कंधामध्ये चार घटक आहेत पृथ्वी,आप,तेज,वायु या चार घटकांनी मिळून शरीर बनते.म्हणजेच मानवरूप होय.
4.4.1.1)पृथ्वी
संपादन4.4.1.2) आप
संपादन4.4.1.3) तेज
संपादन4.4.1.4) वायु
संपादन4.4.2) वेदना
संपादन2)वेदना:- या तिन प्रकारच्या आहेत
4.4.2.1) सुखकारक
संपादन4.4.2.2) दुःखकारक
संपादन4.4.2.3) उपेक्षा वेदनाना सुखकारक,ना दुःखकारक
संपादन4.4.3)संज्ञा:-
संपादन3)संज्ञा:- घर,झाड, गाव,स्त्री,पुरूष आदी नाव देण्याच्या क्रियेलाच संज्ञा म्हणतात.
4.4.4)संस्कार:
संपादन4)संस्कार:- मनावर होणारे संस्कार
4.4.5)विज्ञान:-
संपादन5)विज्ञान:- विज्ञान म्हणजेच जाणीव,चेतना.
*4.5) षडायतन:-
संपादनषडायतन:-षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये,सहा अडथळे यालाच आयतन असेही म्हणतात आयतन म्हणजे द्वार नामरूपातुन याची निर्मिती होते.यामध्ये कान ऐकणे,नाक वास,गंध घेणे,डोळे पहाणे,जिभ चव घेणे,त्वचा स्पर्ष व मन हे मानसिक इंद्रिय आहे.बाहय गोष्टी या इंद्रियामधुन प्रवेश करतात.आपण जागृतपणे त्यांचे निरिक्षण केले व त्या बाहय गोष्टींचा आपल्यावर परिणाम होवु दिला नाही तर या ठिकाणी भवचक्र थांबते व पुढे होणारा अनर्थ टळतो.शक्यतो आनंदाने हुरळुन जाऊ नये,दुःखाने खच्चुन जाऊ नये दुःखा नंतर सुख व सुखा नंतर दुःख हे चालुच असते.तेव्हा समतेत राहिल्यास या बाहय गोष्टींचा प्रवेश होणार नाही आणि भवचक्रातही अडकणार नाही.
4.5.1] कान ऐकणे
संपादन4.5.2] नाक वास,गंध घेणे
संपादन4.5.3] डोळे पहाणे
संपादन4.5.4] जिभ चव घेणे
संपादन4.5.5] त्वचा स्पर्शाची जाणीव होणे
संपादन4.5.6] मन हे मानसिक इंद्रिय आहे
संपादन*4.6) स्पर्श :-
संपादनस्पर्श :बाहय जगाचा सहा इंद्रियांशी येणारा सबंध म्हणजेच स्पर्शहोय.स्पर्शदेखील सहा प्रकारचे आहेत चक्षुस्पर्श,श्रोतस्पर्श,घ्राणस्पर्श,जिव्हास्पर्श,कायास्पर्श आणि मनस्पर्श होय.वाईट प्रवृत्ती रोखणे हे महत्त्वाचे आहे.
*4.7) वेदना:-
संपादनवेदना:-सहा इंद्रियांद्वारे बाहय जगाचा संपर्क आल्यास वेदना होतात.यालाच संवेदना असेही म्हणतात.सुख दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव करणे म्हणजेच त्या एकप्रकारच्या संवेदनाच होय.या तिन प्रकारच्या आहेत 1)सुखद वेदना,2)दुःखद वेदना आणि 3)ना सुखकारक,ना दुःखकारक वेदना (उपेक्षा वेदना)या 3 प्रकारच्या वेदना 6 इंद्रियाच्या संपर्काने 3 Х 6 = 18 होतात तर या 18 तिन काळात (भुतकाळ,वर्तमानकाळ आणि भविश्यकाळात) मिळून 18 Х 3 = 54 होतात तर कुशल ऊर्ध्वगती आणी अकुशल अधोगामी या दोहोत 54 Х 2 = 108 प्रकारच्या वेदना होतात.या 108 प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी सावध चित्ताने,मनाने समतेत राहुन आचरण केल्यास भवचक्रात अडकणार नाही.
*4.8) तृष्णा:-
संपादनतृष्णा:- यालाच सुखोपभोगाची तिव्र इच्छा असेही म्हणतात.सर्व दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे.तृष्णेमुळेच माणसात निरनिराळया रूपांची हाव निर्माण होते.तृष्णाच मानवाला पैसा पत,प्रतिश्ठा,सामर्थ्य तसेच कोणतेही नैतिक,अनैतिक गोष्टी करण्यास प्रवृत्त करते.जसे विस्तवात तुप ओतावे अगदी त्या प्रमाणे माणुस त्यात पोळला जातो.तृष्णा तिन प्रकारच्या आहेत. 1)काम तृष्णा 2)भव तृष्णा 3)विभव तृष्णा असे तिन प्रकार असुन षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये तेव्हा 3 Х 6 = 18 झाल्या. तिन्ही भुत,वर्तमान व भविष्यकाळात धरून त्या 18 Х 3 = 54 झाल्या परंतु त्या आध्यात्मिक काळात व लौकिक काळातही असल्याने या दोन्हींच्या मिळून 54 Х 2 = 108 झाल्या.वेदना आणि तृष्णा यांचा एकमेकांशी घनिष्ठ सबंध आहे.तृष्णा ही आग असुन जागृत राहुन तृष्णा त्याग करावयाचा आहे तसे केल्याने तो पुन्हा पुन्हा भवचक्रात अडकणार नाही.
*4.9) उपादान:-
संपादनउपादान:- तृष्णेच्या तृप्तीसाठी जी क्रिया करतो त्याला उपादान असे संबोधतात.ते चार प्रकारचे आहेत.1)काम 2) मिथ्या दृश्टी 3) शीलव्रत 4)आलवाद तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि तृष्णेच्या स्वरूपाप्रमाणे आपण बाहय वस्तु बाबत आसक्त होतो.त्यातुनच संघर्ष होतो आणि आपण भवचक्रात अडकतो.आपण काही भ्रामक कल्पना, चुकीचे दृश्टीकोन,स्वबदलाच्या कल्पना,इंद्रिय सुखोपयोग,अनिष्ट सवयींच्या मागे लागतो.त्यातुनच भवाची निर्मिती होते.यापासून दुर राहिल्यास भव निर्माण होणार नाही आणि भवचक्रातही अडकणार नाही.
*4.10) भव:-
संपादनभव:- यालाच नवीन निर्मितीची प्रक्रिया असेही म्हणतात.ही उपादानातुनच पुढची कडी म्हणुन निर्माण होते.या सर्व कडया एकमेकांपासुनच निर्माण होत आहेत तेव्हा कोणती कडी तोडुन आपण वरच्या म्हणजे प्रकाशाच्या कडयात जायचे ते आपण आपल्या आचरणानेच ठरवु शकतो.भवाचे तिन प्रकार आहेत 1)काम अथवा कर्मभव 2)रूपभव 3)अरूप भव होय.जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे.पण त्याच बरोबर हे ही खरे की जगातील काहीच नष्ट होत नसते फक्त त्याचे स्वरूप बदलते.जसे घन पदार्थाचे द्रव पदार्थात द्रवाचे बाष्पात रूपांतर होते.जरी हे बदल होत असले तरी पदार्थाचे संख्यात्मक घटक नष्ट होत नाहीत त्यांच्यात बदल होत असतो.मनुष्य मेल्यावर त्याच्यावर अग्नी संस्कार किंवा दहन असे संस्कार केल्याने त्याच्या शरीरातील घटक नष्ट होत नाहीत.त्यांच्यात बदल होत असतो.मनुष्य हा पंच स्कंधाने बनलेला आहे ते म्हणजेच रूप,वेदना,संज्ञा,संस्कार आणि विज्ञान हे होय.रूप,शरीर हे हे अग्नीसंस्काराने बाष्प किंवा भस्म यात रूपांतरीत होते.लहाण मुलगा वाढत जाऊन मोठा होवुन वृद्ध झाला म्हणुन लहाण मुलगा आणि मोठा माणुस एक नाही.असे म्हणताच येणार नाही.म्हणुन भ.बुद्धांनी हा पण नाही अन् तो पण नाही (नच सो नच त्र तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरओ)असे म्हणलेले आहे.जगात काहीच स्थिर नाही.अनित्यतेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वस्तु परिवर्तनशील असल्याने ती नेहमी दुसरे काही तरी बनण्याच्या प्रक्रियेत असते यालाच भव असे म्हणले आहे.
*4.11) जाती:-
संपादनजाती:- भव निर्मितीच्या प्रक्रियेतुन जाती,जन्मची निर्मिती होते.तृष्णेमुळे नवीन जन्म अस्तित्त्वात येतो.जसे एखादया कुतीतुन निर्माण होणारे नवीन अस्तित्त्व नव जन्म.तृष्णेमुळे जिवनात अनेक संघर्ष निर्माण होतात संघर्ष मिटत नाहीत तर त्याचे स्वरूप बदलते.हा संघर्ष चालु असतानाच नवा जन्माची घटना निर्माण होते.संघर्ष नष्ट झाला तर निर्वाण पदाची प्राप्ती होते.तेव्हा तृष्णा त्याग म्हणजेच धम्म होय.आज भारताची लोकसंख्या याचे उत्तम उदाहरण देता येईल त्यासाठी तृष्णेवर मध्यम मार्गाने अंकुश लावुन लोकसंख्या मर्यादीत करा.ते आपल्या सर्वाच्याच अन् पर्यायाने देशाच्या हिताचे आहे.
*4.12) दुःख:-
संपादनदुःख:- यालाच जरा मरण असेही संबोधतात.जरा म्हणजे म्हातारपण अन् मरण म्हणजे मृत्यु होय.जन्म, मरण, रडणे,ओरडणे,ऱ्हास, असंतुष्टता, चिंता, त्रास, पिडा हे सर्व पुढे जन्माच्या साखळीतुनच पुढे निर्माण होत असतात. ज्या,ज्या वस्तुचा,जीवांचा जन्म झाला त्या पुढे जिर्ण होतात.उदा.त्वचा सुरकतणे,केस पांढरे होणे,जाणे, दात पडणे,इंद्रियांची शिथीलता या होण्याच्या क्रियेलाच जरा,म्हातारपण म्हणतात.तर,पंच स्कंधाच्या विस्कळीत पणाने मृत्यु येतो.म्हणजेच पंचस्कंधातील 1)रूप हे पृथ्वी,आप,तेज,वायु पासून बनलेले आहे.2) वेदना 3) संज्ञा 4) संस्कार आणि 5) विज्ञान हे विस्कळीत होतात,नष्ट होवुन दुसऱ्यात परावर्तित होतात.जगातील कोणतीही शक्ती कोणालाही विनाशापासून वाचवु शकत नाही.प्रचंड ग्रह,तारे,सूर्यमंडळ,आकाशगंगा या देखील कोटयावधी वर्षानंतर नष्ट होणार आहेत.तेव्हा मानवाने आपल्या प्रिय व्यक्तिच्या वियोगामुळे किंवा संयोगामुळे रडणे,शोक करणे,चिंता करणे,त्रास करणे,पिडा करणे म्हणजेच दुःख करणे टाळावे.त्यामुळे तो भवचक्रात अडकतो. या भवचक्रातुन मुक्त होण्यासाठी मानवाने स्वतःहुन प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मानवाच्या जिवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत.एक अधोगतीचा तर,दुसरा प्रगतीचा प्रकाशाचा या दुसऱ्या मार्गाने गेल्यास मानवाची प्रगती होते अन् मानवास निर्वाण प्राप्त होते.आत्ता आपण प्रगतीचा मार्ग पाहु.
*4.13) दुःख:-
संपादनदुःख:- चक्राला गती मिळाल्याने अंधारातील आरा दुःखी होतो अन् तो प्रकाशात येतो तेव्हा प्रकाशातील पहिला आरा हा दुःखाचा होय.
*4.14) श्रद्धा:-
संपादनश्रद्धा:- श्रद्धेमध्ये निष्ठा आहे,प्रेम आहे.प्रकाशातल्या पहिल्या दुःखाच्या आराला श्रद्धेची साथ मिळाल्याने हा दुसरा श्रद्धेचा आरा प्रगत होतो.अन तो प्रगत झाल्याने मोद,हर्ष,प्रमोद होतो.
*4.15) प्रमोद:-
संपादनप्रमोद:-दुःखाच्या आऱ्याला श्रद्धेची साथ मिळाल्याने दुःख प्रगत होते अन् याच श्रद्धेतुन प्रमोद होतो.
*4.16) प्रिती:-
संपादनप्रिती:- प्रमोदातुन प्रिती प्राप्त होते.ती इच्छासहीत असते त्या प्रितीत प्रसन्ता असते.
*4.17)प्रष्नाब्धि:
संपादनप्रष्नाब्धि:- प्रितीतुन प्रष्नाब्धि म्हणजेच पूर्ण विश्वास प्राप्त होतो.यापूर्ण विश्वासामुळे दुःख ते दुःख राहत नाही ते सुखाकडे जाते.
*4.18) सुख:-
संपादनसुख:- पूर्ण विश्वासाने सुखाची प्राप्ती होत असल्याने ते सक्षम बनते त्या सुखातुन मन समाधीकडे जाते.हेसुख क्षणिक नाही.त्या सुखातुन मन एकाग्र होते.मन एकाग्र होण्याने समाधी लागते.
*4.19)समाधी:-
संपादनसमाधी:- समाधी म्हणजेच मनाची एकाग्रता,सुखातुन चित्त एकाग्र होते.समाधी लागते
*4.20)यथाभुत ज्ञान दर्शन (प्रज्ञा प्राप्त होणे):-
संपादनयथाभुत ज्ञान दर्शन (प्रज्ञा प्राप्त होणे):- समाधी मधुनच यथाभुत ज्ञानदर्शनहोते,प्रज्ञा प्राप्त होते.
*4.21)उकताहट (अधिरता,लवकर):-
संपादनउकताहट (अधिरता,लवकर) :- एकदा ज्ञान प्राप्त झाल्यावर ज्या अनित्याच्या बाबी आहेत त्या समजुन लवकरात लवकर कामवासनेचा त्याग करणे त्यातुनच परिवर्तन होते आणि विराग किंवा रागहिन होता येते.
*4.22)विराग (विरक्ती,परिवर्तन,रागहिन):-
संपादनविराग (विरक्ती,परिवर्तन,रागहिन):- उकताहटाने कामवासनेचा त्याग केल्याने विराग निर्माण होतो.विरक्ति येते,रागहिन होता येते.
*4.23)विमुक्ती (बंधनातुन मुक्ती):-
संपादनविमुक्ती (बंधनातुन मुक्ती):-विरक्ति,रागहिन विरागाचे जीवन सुरू झाल्याने कार्यभार,नियम बंधनातुन बाहेर पडता येते त्याला मुक्ति मिळते.
*4.24)निर्वाण (तृष्णा नसलेले जीवन,संबोधी प्राप्त होणे):-
संपादननिर्वाण (तृष्णा नसलेले जीवन,संबोधी प्राप्त होणे):-विमुक्तीतून पूर्णतः मुक्ति मिळाल्याने संबोधी प्राप्त होते.तृष्णा नसलेले जीवन बनते.म्हणजेच निर्वाण प्राप्त होते.
तेव्हा या प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताच्या आधारे मानवी जीवनाचे सोने करून घेण्याची हिच वेळ आहे असे समजुन दुःखमुक्तीचा मार्गाचे अवलंबन याच मार्गाने होऊन मिथ्या दृष्टी नाहीशी होऊन जीवन जगत असतानाही सुखाची प्राप्ती होत असल्याने आपल्याला लाभलेल्या या जीवनास !!!अत्त दिप भव !!! प्रमाणे उजाळु अन् दुस-यासही उजाळुन काढु हाच सम्यक संकल्प करू त्यामुळे प्रज्ञा,शील,करुणा जतन व संवर्धन होवुन जग हे धम्मराज्य होवुन धम्माला सद्धधम्म स्वरूप प्राप्त होईल आणि कुशल कम्माने नैतिक व्यवस्था कुशल होवुन सारी मानवजात सुखी क्षेमी आनंदी होईल.