प्रणव सखदेव( जन्म - २६ जून १९८७ )हे एक मराठी लेखक, कवी, युवासाहित्यिक अनुवादक आहेत. ते वृत्तपत्रीय लिखाणही करतात. त्यांना 'काळेकरडे स्ट्रोक्स' या कादंबरीसाठी २०२१ सालचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला.[] साहित्य अकादमी तर्फे दर वर्षी भारतीय युवा साहित्यिकांना (35 वर्षे किंवा त्या खालील) हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

कारकीर्द

संपादन

सखदेव यांनी लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले.[ संदर्भ हवा ]

लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके[ संदर्भ हवा ]

संपादन
  • आर्याची अद्भुतनगरी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी - ॲलिस इन वंडरलॅंड, लेखक : लुईस कॅरोल)
  • इस्रो झेप नव्या क्षितिजाकडे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : गीता आरवमुदन, आर. आरवमुदन)
  • कलाम संच : किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सृजनपाल सिंग, वाय.एस. राजन)
  • कलामांचंं बालपण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक: सृजनपाल सिंग)
  • द काऊन्ट ऑफ माॅॅन्टे क्रिस्टो (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक: अलेक्झांडर ड्यूमा)
  • काळेकरडे स्ट्रोक्स (कादंबरी)
  • गाणे स्थलांतराचे (सन १९१५ ते १९७० या कालावधीत अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या स्थलांतरितांचा सखोल वेध) (अनुवादित, मूळ लेखक इझाबेल विल्जरसनच्या 'द वाॅर्म्थ ऑफ अदर सन्स'चा मराठी अनुवाद)
  • नवी सुरुवात (चित्रमय बालसाहित्य)
  • ९६ मेट्रोमाॅल (अद्भुतिका-कादंबरी)
  • नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य (कथासंग्रह)
  • निळ्या दाताची दंतकथा (कथासंग्रह)
  • पायऱ्यांचा गेम (कवितासंग्रह)
  • मर्डर इन माहीम (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक : जेरी पिंटो)
  • माझं तालमय जीवन (झाकीर हुसेन यांचे व्यक्तिचित्रण), (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका : नसरीन मुन्नी कबीर)
  • माझा भारत... उज्ज्वल भारत (ए.पी.जे. अब्दुल कलामांचे तरुणांसाठीचे उद्बोधक भाषण, अनुवादित, मूळ संपादक : सृजनपाल सिंग)
  • मिशन इंडिया (विकसित भारत - एक ध्येय, ए.पी.जे. अब्दुल कलामांचे तरुणांसाठीचे उद्बोधक भाषण, अनुवादित, मूळ संपादक : वाय.एस. राजन)
  • वन पार्ट वुमन (कादंबरी)
  • विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा (भविष्यातील विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन, अनुवादित, मूळ संपादन : सृजनपाल सिंग)
  • स्मार्टपणे व्हा कॅशलेस
  • हिरवे पक्षी (चित्रमय बालसाहित्य)

पुरस्कार

संपादन


संदर्भ

संपादन
  1. ^ "प्रणव सखदेव, किरण गुरव, संजय वाघ यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार | Sakal". www.esakal.com. 2022-01-09 रोजी पाहिले.