पेनसिल्व्हेनिया
पेनसिल्व्हेनिया (इंग्लिश: Commonwealth of Pennsylvania) हे अमेरिकेच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पेनसिल्व्हेनिया हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे राज्य आहे.
पेनसिल्व्हेनिया Commonwealth of Pennsylvania | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | हॅरिसबर्ग | ||||||||||
मोठे शहर | फिलाडेल्फिया | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३३वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,१९,२८३ किमी² | ||||||||||
- रुंदी | ४५५ किमी | ||||||||||
- लांबी | २५५ किमी | ||||||||||
- % पाणी | १.७ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ६वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,२७,०२,३७९ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १०९.६/किमी² (अमेरिकेत ११वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $४८५६२ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १२ डिसेंबर १७८७ (२वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-PA | ||||||||||
संकेतस्थळ | www.pa.gov |
पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरेला न्यू यॉर्क, वायव्येला ईरी सरोवर, पूर्वेला ओहायो, नैऋत्येला वेस्ट व्हर्जिनिया, दक्षिणेला मेरीलॅंड, आग्नेयेला डेलावेर तर पूर्वेला न्यू जर्सी ही राज्ये आहेत. हॅरिसबर्ग ही पेनसिल्व्हेनियाची राजधानी असून फिलाडेल्फिया हे सर्वात मोठे शहर आहे. पिट्सबर्ग, ॲलनटाऊन व ईरी ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
सुमारे ५०० वर्षांचा इतिहास असलेले पेनसिल्व्हेनिया आर्थिक, औद्योगिक व राजकीयदृष्ट्या अमेरिकेतील एक महत्त्वाचे राज्य मानले जाते. अमेरिकेच्या संघात सामील होणारे पेनसिल्व्हेनिया हे दुसरे राज्य होते (पहिले: डेलावेर). वॉशिंग्टन डी.सी. बांधले जाण्याआधी १७९० ते १८०० ह्या दरम्यान फिलाडेल्फिया ही अमेरिकेची राजधानी होती. पेनसिल्व्हानिया अमेरिकेच्या सर्वात पुढारलेल्या औद्योगिक क्षेत्रामधील एक राज्य आहे. ह्या राज्याचा जीडीपी अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
गॅलरी
संपादन-
बेथलहममधील एक स्टील कारखाना.
-
पेनसिल्व्हेनियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग
-
पेनसिल्व्हेनिया राज्य संसद भवन
-
पेनसिल्व्हेनियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |