पुरंदर विधानसभा मतदारसंघ
पुरंदर विधानसभा मतदारसंघ - २०२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पुरंदर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. पुरंदर तालुका, २. हवेली तालुक्यातील हडपसर महसूल मंडळ (पुणे महानगरपालिकेतील प्रभाग म्हणून गणले गेलेले क्षेत्र वगळून), हडपसर महसूल मंडळातील पिसोली गांव, (वॉर्ड क्र. १३५, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील उंद्री गांव, (वॉर्ड क्र. १३६, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव बुद्रुक. गांव, (वॉर्ड क्र. १४१, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव खुर्द गांव, (वॉर्ड क्र. १४२, पुणे महानगरपालिका) यांचा समावेश होतो. पुरंदर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संजय चंदुकाका जगताप हे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | संजय चंदुकाका जगताप | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | विजयबापू शिवतारे | शिवसेना | |
२००९ | विजय सोपानराव शिवतारे | शिवसेना |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
पुरंदर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विजय सोपानराव शिवतारे | शिवसेना | ६७,९९८ |
दिगंबर गणपत दुर्गाडे | राष्ट्रवादी काँग्रेस | ४४,५२९ |
संजय चंदूकाका जगताप | अपक्ष | ३३,५१३ |
दादा जाधवराव | जद (धर्मनिरपेक्ष) | १४,०५० |
कृष्णा हरीभाऊ लोहोकरे | मनसे | ११,१८० |
दादा जाधव | अपक्ष | १,९५४ |
विजय (बापू) ज्ञानोबा हरपळे | अपक्ष | १,५६४ |
श्रीमंत रुद्रप्पा गायकवाड | बसपा | १,४२७ |
सुरेशदादा बाबूराव वीर | अपक्ष | ७४२ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |