पुणतांबा-शिर्डी रेल्वेमार्ग
(पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागातील रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग दौंड मनमाड मार्गावरील पुणतांबे स्थानकास शिर्डीशी जोडतो. हा मार्ग संपूर्णपणे अहमदनगर जिल्ह्यात आहे. शिर्डीमधील साईबाबांच्या मंदिरास भेट देणाऱ्यांकडून मुख्यत्वे हा मार्ग वापरला जातो.
पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
इतिहास
संपादनया मार्गाची बांधणी २००३मध्ये सुरू झाली व २००९मध्ये हा मार्ग कार्यान्वित झाला. यापूर्वी प्रवासी शिर्डीस जाण्यासाठी पुणतांबे, कोपरगांव, नाशिक रोड किंवा मनमाडपर्यंत रेल्वेने जाउन पुढे इतर वाहनांनी जात असत.
मार्ग
संपादनहा एकपदरी ब्रॉड गेज मार्ग १७.५ किमी लांबीचा असून याचे विद्युतीकरण झालेले आहे. या मार्गावरील वाहतूक सोलापूर उपविभागाच्या अखत्यारीत होते.