पीतकपोल रामगंगा किंवा शिरसाट (इंग्लिश:Central India Yellowcheeked Tit) हा एक चिमणीएवढा मध्यम आकाराचा पक्षी आहे.

या पक्ष्याची शेंडी व माथा काळा असतो. नराचा कंठ, छातीचा मध्य भाग आणि पोट काळे असते. मात्र मादी पिवळट असते.

वितरण

संपादन

हे पक्षी पूर्व गुजरात, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, पूर्वघाटात कृष्णा नदीपर्यंत व पश्चिम घाटात महाबळेश्वरपर्यंत आढळतात.

निवासस्थाने

संपादन

हे पक्षी वनांमध्ये राहतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली